**प्रमाण-विचार**दिनांक 16 .4.2026 . कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेने आपल्या कार्याचा उद्देश, स्वरूप व व्याप्ती यांचे स्पष्ट भान ठेवून तसेच अंतर्बाह्य प्रभावकारी परिस्थिती, अंतर्गत व बाह्य हितसंबंधीयांच्या गरजा व अपेक्षा यांचा योग्य विचार करूनच आपले कार्य करणे आवश्यक आहे. या तत्त्वांच्या आधारे कार्य केल्यास संस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक दृढ होते. होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे ही संस्था ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण, शिस्तबद्ध व समाजाभिमुख कार्य करण्यास कटिबद्ध आहे. संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या तत्त्वांचे पालन करून सातत्यपूर्ण सुधारणा, उत्तरदायित्व आणि समाजहित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.