🌸✨ *यशाची प्रेरणादायी कहाणी – समाजकार्याचा खरा अर्थ!* ✨🌸 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (ISO 9001:2015 मानांकित) यांच्या माध्यमातून आणखी एका गरजू व होतकरू मुलीला उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली आहे! 🙏🌟 सोलापूर येथील कु. *निलीमा दत्तात्रय केंगार* — ज्यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर *B.Tech (Food Technology Engineering)* ही पदवी फर्स्ट क्लासने पूर्ण केली. 🎓💐 शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही अपयश येत होते… निराशा आणि हताशा वाढत असतानाच त्यांनी होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा. नामदेवराव श्रीरंग आयवळे (काका)* यांची भेट घेतली. त्या वेळी काकांनी दिलेला एक दिलासादायक शब्द — *"बेटा, धीर सोडू नको… मी तुझ्या पाठीशी आहे!"* ❤️ याच शब्दांनी निलीमाच्या आयुष्यात नवी आशा निर्माण केली… ✨ काकांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या माध्यमातून मा. *सुहास गोले सर* आणि मा. *सुरेश माळी सर* यांनी पुढाकार घेत, निलीमाशी प्रत्यक्ष संवाद साधून तिच्या अडचणी समजून घेतल्या आणि तिला योग्य मार्गदर्शन केले. 📞🤝 त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले…! 🎉 📢 *दि. २ मे २०२६ रोजी* पुणे येथील *Desai Food Pvt. Ltd.* (Multinational Company) मध्ये *Quality Officer* या पदासाठी नोकरीचे ऑफर लेटर प्राप्त झाले! 🏆🌟 हा क्षण निलीमा, तिचे कुटुंब आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा ठरला. 💐 🙏 निलीमाने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली — संस्थापक अध्यक्ष *मा. नामदेवराव आयवळे (काका)*, मा. *सुहास गोले सर*, मा. *सुरेश माळी सर* तसेच सतत मार्गदर्शन करणाऱ्या *शोभा ताई* यांचे. 🌿 *हीच खरी समाजसेवा — गरजूंना संधी, आधार आणि उज्ज्वल भविष्य!* 🌿 💐 *होलार समाज सामाजिक संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन!* 💐 अशाच प्रकारे समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचो, हीच सदिच्छा! 🙏✨ — *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य* 🌸