श्री शिक्षित तरुण अभियान त्यांने होलार समाज सामाजिक संस्थेच्या मुख्य कार्यालयाला भेट
🚩🌺 **उच्चशिक्षित तरुण अभियंत्याने होलार समाज सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कार्याचे केले मनापासून कौतुक! प्रत्यक्ष भेटीनंतर व्यक्त केला समाधानकारक अभिप्राय!** 🌺🚩
🙏 **अभिप्राय देणारे : श्री. आकाश रावसाहेब भजनावळे** 🙏
🎓 **शैक्षणिक पात्रता :**
- B.Tech in Civil Engineering – Fabtech Engineering College, सांगोला.
- M.Tech in Structural Engineering – NIT, जयपूर, राजस्थान.
🏢 **सध्याचे कार्यक्षेत्र :**\
कंपनी – युनिक इन्फ्रा, पुणे.\
कामाचे ठिकाण – नोबल हॉस्पिटल, मगरपट्टा, हडपसर, पुणे.
🌺 **संस्थेच्या प्रत्यक्ष भेटीनंतर व्यक्त केलेला अभिप्राय!**
श्री. आकाश रावसाहेब भजनावळे यांनी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेच्या गणपत नगर, सर्वे नं. ६३४, पुणे येथील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेले विविध समाजहिताचे उपक्रम, अभियान, विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि समाजातील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचविण्यात येणारी माहिती व सेवा यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
संस्थेचे कार्य पाहिल्यानंतर त्यांनी व्यक्त केले की, संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय सुंदर आणि व्यापक स्वरूपाचे कार्य सुरू आहे. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन हे कार्य पाहण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. संस्थेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
समाजाच्या उपयोगी पडणारी विविध अभियान संस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवत असून, या माध्यमातून तळागाळातील समाजबांधवांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक जनजागृती पोहोचत आहे.
विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
🌺 **शिक्षण • संघटन • स्वाभिमान** 🌺
श्री. आकाश रावसाहेब भजनावळे यांच्यासारख्या उच्चशिक्षित तरुण अभियंत्याने संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून दिलेला हा सकारात्मक अभिप्राय संस्थेच्या सामाजिक कार्याला निश्चितच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आहे.
आज समाजाच्या प्रगतीसाठी केवळ चर्चा न करता शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, महिला सशक्तीकरण, सामाजिक प्रबोधन आणि विविध समाजहिताच्या अभियानांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती करण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.
🙏 **मनःपूर्वक आभार व अभिनंदन!**
श्री. आकाश रावसाहेब भजनावळे यांनी संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल आणि संस्थेच्या कार्याविषयी व्यक्त केलेल्या उत्स्फूर्त, सकारात्मक अभिप्रायाबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार!
आपल्यासारख्या सुशिक्षित, जागरूक आणि कर्तृत्ववान तरुणांचे सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
🚩 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे**\
*ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था*
**संस्थापक अध्यक्ष : आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे**
🌐 अधिकृत संकेतस्थळे :\
[https://holarsamajssp.blogspot.com/](https://holarsamajssp.blogspot.com/)
[https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1](https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1)
**एकच ध्यास — समाजाचा सर्वांगीण विकास!**\
**एकच संकल्प — शिक्षित, संघटित आणि स्वाभिमानी समाज!**