फोटो
दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर विभागातील होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर एक दिवशी विभागीय कार्यशाळा संपन्न झाली
नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे मार्फत
महासंचालक यांच्या मान्यतेने.
_______________________________________________________________________
दिनांक १० जुलै २०२५: छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यशाळा
होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.
नामदेवराव आयवळे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे मार्फत व महासंचालक यांच्या मान्यतेने हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२४: लातूर विभागीय कार्यशाळा
लातूर जिल्ह्यातील होलार समाजाच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कार्यशाळा संपन्न.
श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे - ६१ वा वाढदिवस
वाढदिवसानिमित्त अंध, मूकबधिर व अपंग मुलांना खाऊ वाटप आणि मायेचा आशीर्वाद देताना काही क्षण.
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (नोंदणी क्र. एफ ५३४५२)
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य महिला मेळावा व 'आदर्श माता गौरव पुरस्कार' सोहळा संपन्न.
आमदार सुनिलभाऊ कांबळे यांच्या शुभहस्ते आणि भगवान जावीर गुरुजींच्या उपस्थितीत ३० महिलांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपला सेवक: नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे

















