मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,



 

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे – ISO 9001:2015 प्रमाणित संस्था मार्फत बार्टी पुणे येथे मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन दि. 22 जुलै 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने मा. सुनील वारे साहेब, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे हार्दिक स्वागत व मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. या स्वागत समारंभासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव आयवळे, तसेच शिष्टमंडळातील बबन ऐवळे, शोभा मॅडम, सिताराम ऐवळे उपस्थित होते. यावेळी मा. वारे साहेब यांना फुलांचे बुके देऊन सन्मानित करण्यात आले. या अनुषंगाने दिनांक 10 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील होलार समाजाच्या अडचणी संदर्भात बार्टी पुणे मार्फत एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कार्यशाळेमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठीचे मार्गदर्शन, तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, स्वयं सहाय्यता गट आणि युवागट विकास यावरील सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी संबंधित विविध विभागांचे अधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून उपस्थित समाजबांधवांना या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ दिला.



 

अभिनंदन व स्वागत होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे — ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणित संस्था (नोंदणीकृ संस्थेच्या वतीने नुकत्याच समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या मा. दीपा मुधोळ मुंडे यांचे मन:पूर्वक स्वागत व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव आयवळे आणि सचिव/सदस्य यांच्या शिष्टमंडळाने त्यांना फुलांचे बुके देत मुख्य कार्यालय, पुणे येथे सन्मानित केले. मा. दीपा मुंडे यांचे नेतृत्व प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेचा आग्रह, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यासाठी ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत राहून, केवळ एका वर्षाच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात: प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रस्त्यावर उतरून थेट काम केले, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई (सुमारे १५०० कर्मचाऱ्यांवर), अपहार करणाऱ्या वाहकांवर तात्काळ कारवाई, ब्रेकडाऊन बस संदर्भात नियमित तपासणी व कारवाई, पी.एम.पी.चे संचालनतूट कमी करण्यासाठी प्रवासी व फेऱ्यांचे सुयोग्य नियोजन, उत्पादनात वाढ करून ३ कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले गेले. या सर्व कार्यांची परिणती म्हणून पीएमपीएमएलच्या कारभारात लक्षणीय सुधारणा झाली होती. आता समाज कल्याण आयुक्त या नव्या पदावर त्यांची बदली झालेली असली तरी, त्यांच्या कार्यक्षमता, नेतृत्वगुण व सकारात्मक दृष्टिकोनामुळे समाज कल्याण विभागातही निश्चितच नवसंजीवनी मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!

हे फक्त श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष व संस्थेची शिष्ट मंडळ करू शकतात नुसती घोषणाबाजी नाहीतर प्रत्यक्षात कामगिरी करत आहेत अनेक समाज बांधवांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे नोंदणी क्र.: 53452 स्थापना दिनांक: 08 मार्च 2019 संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थेची भूमिका व ध्येय होलार समाजातील वंचित, गरजू व मागासवर्गीय घटकांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" ही संस्था स्थापन करण्यात आली. समाजसेवेत उत्कृष्टता आणण्यासाठी संस्था ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली संस्था आहे. महत्त्वाची समाजोपयोगी कार्ये: विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना: पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास व अभ्यास व्यवस्था उपलब्ध करून दिली. मोफत कोचिंग क्लासेस: इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमात मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले. शासकीय योजनांचे मार्गदर्शन: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे. कार्यशाळा व संवाद सत्रे: समाजाच्या अडचणी व गरजांवर लक्ष केंद्रित करून बार्टी, पुणे यांच्या सहकार्याने विविध विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या: या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ची प्रक्रिया, अडचणी या विषयावर मार्गदर्शन व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, बार्टीच्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले होते ‌ त्यामुळे अनेक समाज बांधवांना जातीचे दाखले जात पडताळणी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहेत. सांगोला (10 मार्च 2023) नाशिक (26 सप्टेंबर 2023) लातूर (27 फेब्रुवारी 2024) छत्रपती संभाजी नगर दिनांक 10 जुलै 2025 रोजी प्रतिनिधी बैठका: 16 जानेवारी 2024 रोजी बार्टी कार्यालय, पुणे येथे होलार समाजाच्या प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित. आली होती महासंचालक बार्टी यांनी समाजाच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन: बिबेवाडी, पुणे (18 फेब्रुवारी 2019 29 मे 2023 रोजी) युवक-युवतींसाठी ऑनलाईन कार्यशाळा (17 जुलै 2023) होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही केवळ समाजसुधारणेची भूमिका निभावत नाही, तर गुणवत्ता, व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांचा आदर्श घालून देत आहे. शिक्षण, प्रशिक्षण, आणि शासनाशी संवाद हे या संस्थेच्या कार्याचे प्रमुख स्तंभ आहेत. ही संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित घटकांसाठी दिशा दर्शक ठरत असून इतर संस्थांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरत आहे. ISO प्रमाणित, लोकसेवेच्या कार्यात अग्रभागी असलेली ही संस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश – शिक्षण, सशक्तीकरण, आणि आत्मनिर्भरता.


 

श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य. पुणे/ IS01 :2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था सर्वे नंबर 634/7 अ, गणपत नगर, बिबेवाडी, पुणे- 411037 उपक्रमाची थोडक्यात माहिती: होलार समाज सामाजिक संस्था ही महाराष्ट्रा राज्य, येथील एक मान्यताप्राप्त आणि ISO 9001:2015 प्रमाणित संस्था आहे. समाजात आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही संस्था विविध स्वरूपाचे व्यावसायिक उपक्रम राबवत आहे. उद्दिष्ट: "एकी हेच बळ, एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!" ही भावना जपत संस्था समाजातील युवक-युवती, महिला बचत गट व स्वयंसेवी संस्था यांना छोट्या उद्योगासाठी प्रेरणा व पाठबळ पुरवते. मुख्य वैशिष्ट्ये: नोकरी करत असतानाच, रिकाम्या वेळेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी कल्पना तुमची – प्रॉडक्ट आमचे – गुंतवणूक आमची – नफा तुमचा! व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, भांडवल, प्रशिक्षण आणि विपणन यामध्ये सहकार्य महिला बचतगट आणि इच्छुक व्यक्तींना विशेष प्राधान्य संपर्क करण्यासाठी: इच्छुक व्यक्तींनी किंवा महिला बचतगटांनी संस्थेशी थेट संपर्क साधावा. तुमची कल्पना, आमचं पाठबळ – चला एकत्र प्रगती करूया! 97 66 33 3 9 99 -7219 108372 - 930935655 - 7972140451

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts