मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

❍ मागासवर्गिय कल्याणकारी योजना ❍*

*⫷⫸❑❑⫷⫸✺✺✺✺✺⫷⫸❑❑⫷⫸*


*🍁पुणे महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना खालीलप्रमाणे-🍁

▪️👉🏻मागासवर्गीय लोकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण
१८ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षण काळात मासिक बस पास दिला जातो.

▪️👉🏻महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन सायकली
इयत्ता अकरावी तसेच त्यापुढील वर्गात मान्यताप्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरचे परिक्षेमध्ये ५० टक्के गुण मिळाले असल्यास तसेच घरापासून महाविद्यालयाचे अंतर २ किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास सायकल दिली जाते.

▪️👉🏻महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. याकरिता विद्यार्थ्यांनी दररोज २ तास सामाजिक उपक्रमात काम करणे अपेक्षित आहे.

▪️👉🏻घाणभत्ता घेणाऱ्या मनपा सेवकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य देणे
मनपा कर्मचारी ज्यांना घाणभत्ता मिळतो अशा सेवकांच्या माध्यमिक शिक्षण घेत असणाऱ्या जास्तीत जास्त दोन मुलांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी प्रत्येकी ५००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

▪️👉🏻पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिले जाते.

▪️👉🏻अभ्यासिका
इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शालेय वेळेनंतर अभ्यासिकेची सोय केली जाते. शिक्षकांना दरमहा २,००० रुपये मानधन दिले जाते. अभ्यासिकेत आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले जाते.

▪️👉🏻गुणवत्ता वाढ
इयत्त नववीत ५० टक्के गुण मिळवणाऱ्या व वाल्मिकी समाजातील ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीसाठी खासगी क्लाससाठी ५००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

▪️👉🏻ग्रंथालय
शहरातील ३ ठिकाणी ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांना १०० रुपये डिपॉझिटट घेऊन दर्जेदार पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. ग्रंथालयाला मासिक शुल्क नाही.

🍁- हुतात्मा स्मारक, आर.टी.ओ. ऑफिस समोर, येरवडा, पुणे -०६

🍁- संत ज्ञानेश्वर समाज मंदिर, भवानी पेठ, पुणे - ४२

🍁- कुसाळकर अभ्यासिका, कुसाळकर पुतळ्यासमोर, गोखलेनगर, पुणे- १६

▪️👉🏻१८ ते ४५ वयोगटातील बेरोजगारांना विविध व्यवसायाची संधी आणि प्रशिक्षणाची संधी याबाबत उद्योजकता शिबिराबाबत मार्गदर्शन केले जाते.

▪️👉🏻मागासवर्गीय १८ ते ४५ वयोगटातील महिला व पुरुषांना स्वयंरोजगारासाठी १०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

▪️👉🏻लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १० वी)
इयत्ता दहावीत ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभरात केलेल्या खर्चासाठी जास्तीत जास्त १५००० रुपये अनुदान दिले जाते.

▪️👉🏻डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १२ वी)
इयत्ता बारावीत किमान ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षणासाठी केलेल्या खर्चापोटी २५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

▪️👉🏻१२ वी खासगी क्लाससाठी अर्थसहाय्य
इयत्ता अकरावीत ६० टक्के गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना बारावीच्या खासगी क्लाससाठी १०,००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

▪️👉🏻इयत्ता १२ वीसाठी सीईटीसाठी अर्थसहाय्य
जे विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसतात अशा विद्यार्थ्यांना सीईटीच्या तयारीसाठी १०,००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. (टिपः अ.क्र. 

▪️👉🏻किंवा अ.क्र. १४ पैकी एका योजनेचा लाभ घेता येईल)

▪️👉🏻उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत असतील व मागील परीक्षेत ६० टक्के गुण मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. उदा. कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी. त्यांच्या प्रशिक्षण काळात सतत उत्तीर्ण झाल्यास दरवर्षी १०,००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

▪️👉🏻व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य
१८ ते ४५ वयोगटातील युवक अंमली पदार्थाच्य आहारी गेल्यास त्यांना त्यापासून मुक्त करण्यासाठी शासनमान्य अथवा मान्यताप्राप्त व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी ७००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

▪️👉🏻डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाती विद्यार्थ्यांना जेवणासाठी होणारा खर्च पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत ५० टक्के खर्च मागासवर्गीय कल्याण निधीतून अनुदान म्हणून देण्यात येतो.

▪️👉🏻स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे
सन २०१०-११ पासून सदरची योजना कार्यान्वीत झाली असून पदवीधर मागासवर्गीय मुलांना एमपीएससी/युपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळणे व सदर मुलांना स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणे हा योजनेचा उद्देश आहे. पुणे विद्यापीठामार्फत हे केंद्र चालविले जाते.

▪️👉🏻वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
नळ कनेक्शनसाठी ५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

▪️👉🏻झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
झोपडी दुरुस्तीसाठी १०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

▪️👉🏻वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या वीज कनेक्शनसाठी ५००० रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

▪️👉🏻सुलभ शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य
मागासवर्गीय नागरिकांना सुलभ शौचालय बांधण्यासाठी १५००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)
 ◆◆◆◆◆●●●●●●●●◆◆◆◆◆◆
     🙏🏻 सौजन्य 🙏🏻
    🔘 पुणे महानगरपालिका 🔘

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts