मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. विनापरीक्षा होणार भरती  अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल. एकूण पदसंख्या : ३६१२ पदाचे नाव व पदसंख्या : 1) फिटर 941 2) वेल्डर 378 3) कारपेंटर 221 4) पेंटर 213 5) डिझेल मेकॅनिक 209 6) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 15 7) इलेक्ट्रिशियन 639 8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 112 9) वायरमन 14 10) Reff. & AC मेकॅनिक 147 11) पाईप फिटर 186 12) प्लंबर 126 13) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 88 14) PASAA 252 15) स्टेनोग्राफर 08 16) मशीनिस्ट 26 17) टर्नर 37 शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT वयाची अट : २७ जून २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही] वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार. नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र) ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी :  rrc-wr.com 

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts