मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी अत्यंत होलार समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय:- मा.महासंचालक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण बार्टी पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठक घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज इतिहासांत प्रथमच महाराष्ट्र राज्यातील होलार समाजातील यवक- युवतीसाठी " आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने" आॅनलाईन पध्दतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. मा.महासंचालक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी), पुणे मा. महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली दिनाक 17 जुलै, 2023 रोजी वेळ दुपारी 3.30 वाजता मोठ्या संख्येने विद्यार्थी औरंगाबाद, जालना,लातुर, बिड, उस्मानाबाद, परभणी,हिगोली, नांदेड, नागपूर, भडारा,गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, आकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, पुणे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील होलार समाजामधील युवक- युवतींना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची अधिछात्रवृत्ती (BANRF), IBPS, पोलिस व मिलीटरी, सेट/नेट, जेईई/नीट,MPSC,UPSC,इ.स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थाना शैक्षणिक प्रोत्साहन व विविध क्षेत्रातील विषयावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केले मा.महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली आरती भोसले मॅडम विभाग प्रमुख बार्टी पुणे श्रीमती स्नेहल भोसले मॅडम निबंधक तथा विभाग प्रमुख डाॅ.सारिका थोरात प्रकल्प व्यवस्थापक व पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करून होलार समाजातील विद्यार्थाची मने जिंकली तसेच संस्थेच्या वतीने आपले प्रथम मनपूर्वक आभार आभार मानावेत तेवढे थोडेच आहे धन्यवाद

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts