मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्थ महाराष्ट्र राज्य या संस्थेने कमी वेळेत जमाज हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. संस्थेचे ध्येय उधष्ट एकच वसा जबाबदार नागरिक घडविण्याचा. या हेतूने होलार समाज सामाजिक संस्थेची स्थापना 2019 मध्ये होलार समाजाचे प्रेरणा स्थान व समाज भुषण आदरणीय श्री भगवान हरीबा जावीर गुरूजी यांच्या सहकार्याने केली आहे. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष संस्थेमध्ये 2019 आज अखेर कार्यरत असलेल्याचा मागोवा घेताना मला अतिशय आनंद होत आहे. या संस्थेमध्ये विविध योजनांची विविध प्रशिक्षणाचा प्रचार अनेक कार्य संस्था समाजाच्या कल्याणकारीता खालील प्रमाणे राबवित आहे. मागील पांच वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असुन आज होलार समाजाला पडणा-या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या.संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. या. सोबत संस्थेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे गरजू विद्यार्थीना दत्तक घेऊन त्यांची पुणे येथे राहाण्याची जेवणाची मोफत सोय केली आहे. तसेच शहरी आणि वस्तीपातळीवरील दुर्बलब घटकातील मुला - मुलीना सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गरीब गरजू विद्यार्थासाठी इयता: आठवी पासून ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडियमचे क्लासेस मोफत सुरू करण्यात आले आहेत. तसेच शुभमगल सावधान सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवुन विवाह करण्या-या एक जोडप्यास विस हजार रुपये अर्थसहाय्य शासनाच्या माध्यमातून दिले जाते संस्थेच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तेथे सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच महिला सक्षमीकरण या. उपक्रमांतर्गत वस्तीपातळीवरील विधवा व संकटात सापडलेल्या महिलांसाठी व समस्याग्रस्त महिलांसाठी आणि त्यांचा कुटूंबीयासाठी अतिशय महत्वाचे सल्ला व मार्गदर्शन केले जाते. तसेच महिला बचत गटासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. शिल्पकार तयार करणे , एलडी, बल थ्रीईन वन कलर टुबलाईट डेकोरोशन लाईट युएसबी डिसीबल आॅलराऊड बल कापसापासुन वा ती तयार करणे इत्यादी उपक्रम सुरू केले आहेत. भविष्यात नक्कीच होलार समाजाच्या उल्थांनात मैलाचा दगड ठरतील यात वाद नाही.याबरोबर हेही नमुद करणे अगत्याचे आहे. की होलार समाजाने केवळ रस्त्यावर लढाई लढण्यापेक्षा संविधानिक प्रावधानाच्या माध्यमातून निर्माण झालेले विविध कायदे योजना, प्रकल्प यांच्या अंमलबजावणीसाठी जागृत राहून समाजाला खरा न्याय मिळवून दिला पाहिजे. येत्या काळात 2023 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्याचा संस्थेचा प्रमाणीक प्रेयत्न आहे. गरीब गरजू युवक युवतीचा आर्थिक व शैक्षणिक वैचारिक विकास साधून अदर्श नागरिक घडविणे युवा गटाच्या अंतर्गत एकत्र येऊन युवक - युवतींना स्वर्व गणी विकास व समाजाचा सर्व गणी विकासासाठी उद्योग व्यवसाय कार्यशाळा व मार्गदर्शन शासनाच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात याबाबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 11 सदस्य एक समिती संस्था स्थापन करून समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या समितीला प्रशासकीय अधिकारी व महसूल विभाग तसेच समाज कल्याण अधिकारी आणि बार्टी पुणे हे वेळोवेळी मार्गदर्शन करतील आणि ब-यापैकी अडचणी सुटतील असा मला विश्वास आहे. संपर्क, 9764969074 तुमच्या आमच्या हाक्काच माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts