मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

अनुसूचित जातीतील युवक-युवतींच्या स्वप्नांना कौशल्याचे बळ देणारी “बार्टी” !!! बार्टी व आय.जी.टी.आर मार्फत अनुसूचित जातीतील ८५० युवा-युवतींसाठी कौशल्य विकासाचे ‍मोफत निवासी व अनिवासी प्रशिक्षण दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू पुणे :- दि. २५ : बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मोफत निवासी व अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) व इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येत असलेली एक स्वायत्त संस्था) यांच्यामध्ये दिनांक १८/०७/२०२३ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी), पुणे व एम. एस. एम. ई. टेक्नॉलॉनजी सेंटर, इंडो जर्मन टुल रूम (आय.जी.टी.आर), औरंगाबाद यांच्या व्दारे अनुसूचित जातीमधील ८५० युवक-युवतींसाठी पुर्णवेळ निवासी व अनिवासी नि:शुल्क कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांकरिता विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. आय.जी.टी.आर. ही भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्य उद्यम मंत्रालयामार्फत संचलित संस्था आहे. या संस्थेव्दारे एकुण १८ प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. सर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळुज (औरंगाबाद) या ठिकाणी आयोजित केले आहेत. प्रशिक्षण पुर्णत: नि:शुल्क असुन प्रशिक्षणाचा संपुर्ण खर्च बार्टी, पुणे मार्फत केला जाणार आहे. निवासी प्रशिक्षण फक्त आय.जी.टी.आर. औरंगाबाद या ठिकाणी उपलब्ध असुन संस्थेच्या उर्वरित उपकेंद्रात पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळुज (औरंगाबाद) या ठिकाणी अनिवासी प्रशिक्षणाची सोय आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींच्या प्राप्त अर्जांमधुन निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश व मुलाखती साठी बोलविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अपुर्ण अर्ज, मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. (पात्रता परीक्षा - इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान याविषयावर आधारित राहील.) “बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे. महत्वाचा निकष :- उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचे शिक्षण प्रशिक्षणाकरिता दहावी ते पदवीधर (प्रशिक्षण वर्गाच्या पात्रतेनुसार) असावे. वयोगट- १८ ते ३० महत्वाच्या तारखा :- अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख - ०९/०९/२०२३ पात्रता प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत :- १२/०९/२०२३ प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख :- १५/०९/२०२३ प्रशिक्षण ठिकाण :- इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद , पुणे, नागपूर,कोल्हापूर आणि वाळुज उपकेंद्रे रजिस्ट्रेशन लिंक: - https://rb.gy/7atzg सविस्तर माहितीसाठी पात्र उमेदवारांनी कृपया बार्टी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट द्यावी :- https://barti.in/notice-board.php

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts