*आदरणीय मागासवर्गीय प्रवर्गातील बांधवांनो,तुम्हांला माहिती असेलच की नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ग्राम- सातनवरी, अमरावती रोड,नागपूर हे विदर्भातील दर्जेदार शिक्षण देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय असून, जिथे फक्त मागासवर्गीय जातीच्या मुलामुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते.* ज्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.कॉलेजमध्ये एकूण पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शाखा व पदव्युत्तर अभ्यासक्रम मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) आहेत. पाचही शाखांमध्ये प्रत्येकी 60 व MBA मध्ये 120 जागा आहेत.१. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग [Computer Science and Engineering (CSE)] - 60२. आर्टिफिशील इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग [Artificial Intelligence and machine learning (AIML)] - 60३. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग [Electrical Engineering (EE)] - 60४. मेकॅनिकल इंजिनिअरिंग [Mechanical Engineering (ME)] - 60५. सिव्हिल इंजिनिअरिंग [Civil Engineering (CE)] - 60६. मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन [Master of Business Administration(MBA)] -120आपणास विनंती आहे की पालकांना व विद्यार्थ्यांना आपल्या इथे दिल्या जाणाऱ्या सोई व सवलती विषयी समजवून सांगून जागरुकता निर्माण करण्यास मदत करावी. तुम्ही सामाजिक स्तरावर इतर अनेक संस्थांशी संबंधित आहात. शिक्षणाचे महत्त्व तुमच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर आर्थिक परिस्थिती मुळे पुढे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो परंतु तुमच्या एका सल्ल्याने सामाजिक विकास होण्यास मदत होऊ शकते. येथे मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व कॉलेज बस मोफत आहे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठीही पूर्ण व्यवस्था आहे हे लोकांना सांगणे आवश्यक आहे.*मागासवर्गीय जातींच्या विद्यार्थ्यांना शासनाद्वारे देय असणारा वार्षिक देखभाल भत्ता व विद्यापीठ परीक्षा शुल्क याबाबत अंदाजित किमान ८ ते १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होईल.या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मागासवर्गीय जातीचा विद्यार्थी अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी आपण सहकार्य करू शकता.*महाविद्यालयीन स्तरावर उपलब्ध सुविधांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे - (Facilities Available)*१. गुणवत्ता व आर्थिक निकड लक्षात घेता विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत वसतिगृह असेल.२. प्रति विद्यार्थी प्रति सेमिस्टर प्रात्यक्षिक करिता लागणारी स्टेशनरी आणि पुस्तके विनामूल्य उपलब्ध राहतील.३. मोफत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सुविधा४. MPSC, UPSC, बँकिंग इत्यादी स्पर्धात्मक परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन५. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरऍक्शन सेल६. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनीं करिता शासकीय वसतिगृहा मध्ये ऑनलाईन/ ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया या महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येईल*संपर्क व्यक्ती (Contact Person):*१. डॉ.संजय केलो (प्राचार्य) - 9421818770२. डॉ. एम. के. रहांगडाले (उपप्राचार्य) - 9049472992३. डॉ. एस. एस. खान(CSE) - 9823173361४. प्रा. सुधीर गोवर्धन (TPO) - 9730764496५. डॉ. मोईन देशमुख (MBA) - 9158433337
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...