होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेचे, अध्यक्ष श्री.नामदेवराव आयवळे हे "महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना" अतिशय नम्रपणे आव्हान करण्यात येते की, एकीकडे आज आपला भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना, भारतीय संविधानाने आपणांस अनुक्रमांक 26 व 27 या नोंदणी अंतर्गत अनुसूचित जाती मध्ये आपला समावेश केला आहे. तेव्हा इतर अनुसूचित जाती समूहाचा विचार करता, आपला आपल्या सर्व सुज्ञान बंधू आणि बहिणींना स्वतःच्या मनाला अंतर मुक्त होऊन काही विचारावे. ते खालील प्रमाणे :-आमची मते असू शकतात, यापेक्षा आपले प्रश्न आणखी काही वेगळे असू शकतात. १) होलार समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी.२) शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण.३) जातीचे अस्तित्व व चुकीच्या नोंदी संदर्भात. ४) स्त्रियांचे स्थान५) होलार,होलेर, मांग या मधील अडचणी.६)होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी.७) विविध शासकीय योजनांच्या माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली जात नाहीये.८)शिक्षणाचा अभाव, उत्पन्नाच्या साधनाचा अभाव,रूढी परंपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस अशा उपाययोजना नाहीत. वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये. अशा निर्माण झालेल्या अडचणी आहेत. तसेच1 होलारांची शैक्षणिक परिस्थिती काय? 2 होलाराची सामाजिक परिस्थिती काय?3 होलारांची राजकीय परिस्थिती काय ?4 होलारांची आर्थिक परिस्थिती काय ?या सर्व प्रमुख प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो,तेव्हा आपणास या सर्वांचे उत्तर शोधताना लक्षात येईल की,या चार प्रश्नाच्या परिस्थितीला जबाबदार कोण ? याच जिम्मेदार कोण ? तेव्हा उत्तरे आपल्या लक्षात येतील, की या सदरील परिस्थितीस आपण स्वतः देखील तेवढेच जबाबदार! जेवढे आपण इतरांना समजतो. बंधूंनो गेल्या 75 वर्षापासून आपण जे जीवन जगत आहोत याला जगणे नाही,तर दिवस काढणे किंवा लाचारीचे जगणे म्हणतात.काय कामाचे? यामुळे कदाचित तुम्हाला चिड येईल, वाटेल की आम्ही लाचारी जगणं जगतोय, तर आज ही परिस्थिती कोणताही देव किंवा चमत्कार बदलू शकत नाही. तर यासाठी आपला तथागताचा अंत दीप भव या सम्यक विचारांना आचरणात आणावे लागेल. तरच ही गुलामीची, लाचारीची व्यवस्था बदललेल. अन्यथा आज ना समाजाला नेता नाही, ना समाजाचा राष्ट्रीय पक्ष नाही , राष्ट्रीय संघटना नाही, जर असेल तर ही वरील परिस्थिती आज तागायत का बदलली नाही. किंबहुना जाणीवपूर्वक कुणी बदलू दिली नाही. असे असेल तर का? आणि कशासाठी? समाजाला दिशा नाही, वैचारिक आधार नाही, विचारधारा नाही, समाजाचे स्वतःचे अस्तित्व नाही, किंवा अस्मितेचा शोध नाही, मग किती दिवस असे मेंढरासारखे जीवन आपण जगणार आहोत. कारण विश्वरत्न , बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो दंड ठोकून बंड करायला ,तयार होत नाही. यासाठी मित्रांनो आज ही वेळ आली आहे ,की आपण समाजाचे नाक, कान, डोळे बनलो पाहिजे. समाजावरील अन्याला वाचा फोडली पाहिजे. समाजाबद्दल बोलायचे नाही, समाजातल्या परिवर्तनाचा विचार ऐकायचा नाहीये, बास करा मित्रांनो आता तरी जागे व्हा.आणी समाजातील जागरूकता वाढवण्यासाठी समाजाला दाखलपात्र करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला या गुलामीतून मुक्त करण्यासाठी आता तुम्हाला, आम्हाला एकत्र आले पाहिजे. आणि समाजावर होणाऱ्या सामाजिक , राजकीय, शैक्षणिक , आर्थिक अत्याचाराच्या विरोधात पेटून उठले पाहिजे आणि समाजाला शासन प्रशासनामध्ये दाखलपात्र ठरवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक सामाजिक चळवळ उभा केली पाहिजे. व त्यातून योग्य नेता, पक्ष व अस्मिता, प्रेरणा शोधून समाजाचा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही शिकल्या सवरलेल्या समाजबंधू आणि भगिनींनी केला पाहिजे. तरच हा समाजाचा आवाज ,लढा, बुंदल होईल. अन्यथा आपण जर षंड होवुन थंड झालो, तर ही स्वतःची ओळख नामो निशाण व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी बुद्धिजीवी लोकांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने वरील अडचणी सोडवल्या पाहिजेत. त्या दिशेने होलार समाज सामाजिक संस्थेचे काम प्रामाणिकपणे चालू आहे.आणि ते असेच चालू राहील. आपल्या हक्काचा माणूस श्री.नामदेव आयवळे
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...
-