प्रति. मा.सुनील वारे सर महासंचालक.डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे.विषय:-वंचित होलार समाजातील विद्यार्थ्यांनी बार्टी मार्फत घेण्यात येणारी एमपीएससी पूर्व परीक्षा दिली, पण त्यांची नावे लिस्टला आलेली नाहीत तरी आपल्या विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात आलेल्या जागेतून जास्तीत जास्त होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी.कारण होलार समाजाचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला टिकत नाहीये वंचित आहे. परिस्थिती हलकीशी आहे अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजाच्या होतकरू गरीब,कार्यक्षम, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेस सक्षमपणे आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाता यावे व त्यांचा सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा,या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे.मार्फत वंचित होलार समाजातील युवक-युवतींना राज्यसेवा स्पर्धा परीक्षा तयारीसाठी बार्टीमध्ये प्रवेश मिळावा. तसेच दिनांक 30/10/2023 रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात आलीनिवेदनाची तातडीने सहनभूतीपूर्वक व गंभीरतापूर्वक विचार करून समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळावा हे नम्र विनंती.होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यआपला विश्वासूतुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे.
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...