मा. धम्म ज्योती गजभिये साहेब. व्यवस्थापकीय संचालक.लीडकॉम संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत व्यवसाय) प्रधान कार्यालय मुंबई लाईव्ह बिल्डिंग पाचवा मजला 45 ,वीर नरिमन रोड मुंबई व्यवस्थापकीय संचालक.यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवर यांच्या समवेत गुरुवार दिनांक 26 10 2023 रोजी होलार समाजाच्या समस्या सोडविण्या संदर्भात तसेच मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस लिडकॉमचे व्यवस्थापकीय कार्यालय मुंबई येथे होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे महाराष्ट्रातील शिष्टमंडळ समाज बांधव यांनी संत रोहिदास धर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनामधून होलार समाजाला आर्थिक लाभ मिळावा व जाचक अटी शिथिल करून होलार समाजाला जास्तीत जास्त लाभ मिळावा असे निवेदन देण्यात आले. त्यावेळी मा. व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये साहेब.यानी लीडकॉम मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाचे व मार्गदर्शन केले तसेच होलार समाजास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे निर्धारित केले.तसेच त्यावेळी सर्व अधिकार पदाधिकारी उपस्थित खेळीमिळीत बैठक संपन्न झाली.आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...