मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

*होलार समाज सामाजिक संस्था प्रतिनिधी व बार्टी समतादुत नियोजन बैठक इतिवृत्त....* *जिल्हा सांगली* 1) होलार समाज सामाजिक कार्यकर्ते व बार्टी समतादूत यांची संयुक्त बैठक आज दिनांक 20/ 11/ 2023 रोजी सांगली सामाजिक न्याय भवन कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी ठीक 12:30 वाजता संपन्न झाली.2) सदरच्या बैठकीमध्ये उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वागत बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे व समतादूत यांच्या हस्ते पुस्तके व संविधानाचे उद्देशिका हे येऊन करण्यात आले.3) सांगली जिल्ह्यातील समतादूत यांचे उपस्थित मान्यवरांना तालुका निहाय ओळख करून देण्यात आली व सध्या करीत असलेल्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली.4) प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली सदरच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना समता दूत मार्फत कशा पद्धतीने राबविण्यात येतात याबाबत माहिती दिली तसेच समतादुत व होलार समाजातील विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रित रित्या विविध योजना कशा पद्धतीने राबवता येतील याबाबत चर्चा करण्यात आली.5) यामध्ये प्रामुख्याने जातीचा दाखला होलार समाजातील शैक्षणिक प्रगतीचा स्तर वाढवणे, युवक युवतींसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण बाबत प्रचार प्रसार करणे.6) होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा नामदेवराव आयवळे यांनी होलार समाजाच्या असणाऱ्या विविध समस्या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्रामुख्याने कोलार समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात अन्याबाबत बार्टीच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात यावे असे सांगितले.7) समाजातील बहुतांशी लोकांच्या जातीच्या नोंदी चुकीच्या लागल्या आहेत याबाबत जात पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबतचे आदेश बार्टीचे महासंचालक मा सुनील वारे साहेब यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे असे मनोगत आयवळे साहेब व्यक्त केले.8) बार्टीच्या व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार व माहिती तालुक्यातील होलार समाजातील विविध वाड्यात वस्त्यांवर समता दूत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग व बार्टी च्या योजनांच्या प्रचार प्रसार करून लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असे सांगितले.9) महिलांच्या उन्नती करिता बार्टीच्या समतादूत यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजातील महिलांचा दर्जा उंचावण्याकरिता विशेष उपक्रम समाजातील सामाजिक कार्यकर्ते व बार्टीचे समतादूत यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्याबाबत चर्चा करण्यात आली.10) समतादूत सागर आढाव यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता समाजातील लोकांना सर्वप्रथम महसूल विभागाच्या माध्यमातून व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जातीचा दाखला मिळण्याबाबत समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा व सदरची बाब शासनाच्या निर्देशनास आणण्याबाबत प्रयत्न करावा जेणेकरून जातीचा दाखला मिळाल्यानंतर वरील सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येतील.11) समता दूत आबासाहेब भोसले यांनी तालुका निहाय होलार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची गाव निहाय संपर्क नंबर देण्यात यावा जेणेकरून समता दूत व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयाने तालुक्यातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात येतील व जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ देता येईल यासाठी तालुका निहाय सामाजिक कार्यकर्त्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये तालुका निहाय समतादूत यांना ऍड करून बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व प्रचार प्रसार करता येईल असे सुचवले.12) नामदेवराव अहिवळे यांनी बार्टी मुख्यालय या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील होलार समाज्यातील 714 गावांची यादी देण्यात आली आहे असे सांगितले व त्यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील समतादुत यांना आदेशित करण्यात येणार आहे असेही सांगितले. सदरच्या गावांची यादी व सदरच्या बाबतीचा आदेश बार्टी मुख्यालयाकडून प्राप्त झाला आहे का याबाबत विचारणा करण्यात आली.13) प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी सांगली जिल्ह्यातील होलार समाज 714 गावांची यादी प्राप्त झाली नाही परंतु होलार समाजातील गावातील वाड्यांवर बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यात यावा याबाबतचा मौखिक आदेश देण्यात आला आहे असे सांगितले.14) होलार समाज प्रतिनिधी भगवानदास केंगार व कांबळे यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी जत व खानापूर या ठिकाणी समतादूत रिक्त आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समतादूत यांची नियुक्ती करणे खूप गरजेचे आहे कारण सदरच्या ठिकाणी होलार समाज बहुसंख्येने आहेत तरी सदरच्या तालुक्यामध्ये समतादूत यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होलार समाज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.15) प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय होलार समाजातील प्रतिनिधी यांचा संपर्क नंबर व जिल्ह्यातील गावांची यादी देण्यात यावी व या दोघांच्या समन्वयाने विविध ठिकाणी विविध उपक्रमाचे व कार्यक्रमाचे तसेच विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्याकरता बार्टी च्या समता दुतांच्या वतीने पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. 16) होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव अहिवळे यांनी समता धुतांना सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल व सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनांच्या प्रचार प्रसार व विविध उपक्रम गाव, वाड्या वस्ती मध्ये यशस्वी राबवण्यात येतील.17) बैठकीचे आभार समतादूत आबासाहेब भोसले यांनी उपस्थित असलेल्या होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे व उपस्थित असलेल्या विविध तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी यांचे बार्टी समता दूत प्रकल्पाच्या वतीने विशेष आभार मानले व इथून पुढे समता दूत व होलार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकत्रित समन्वयाने जिल्ह्यातील विविध गाव, वस्त्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व बार्टीच्या विविध योजना ंचा प्रचार प्रसार करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल असे मनोगत व्यक्त करून सदरची बैठक यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल बार्टीच्या सर्व समता दूत व उपस्थित सर्वांचे आभार मानले. व सर्वांच्या अनुमतीने आजच्या बैठकीचा समारोप करण्यात आला.गणेश सवाखंडेप्रकल्प अधिकारी, बार्टीजिल्हा सांगलीगणेश सवाखंडेप्रकल्प अधिकारी, बार्टीजिल्हा सांगली

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts