मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

सांगली येथे एकाच दिवशी दोन बैठका ----------------------------------------------होलार समाज सामाजिक संस्थेने मागील पाच वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नला सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.मा.सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या आदेशाने नियोजन बैठक. सांगली ----------------------------------------------मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळ मुंबई. यांच्या आदेशाने नियोजन बैठक. सागली होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नाने सांगली येथे सामाजिक न्याय भवन बार्टी कार्यालय कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी बैठक दि.20 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी 12 वा आयोजित केली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टीच्या अंतर्गत होलार समाजातील सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक ,अडी -अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सांगली येथे जिल्हा व्यवस्थापकसंत रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, संभाजीनगर ,बुधगाव रोड ,सांगली. येथे दिनांक 20 नोव्हेंबरला 2023 रोजी दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संत रोहिदास धर्म उद्योग महामंडळाच्या अंतर्गत होलार समाजातील गरजू लाभार्थ्यांच्या समक्ष सोडवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील होलार समाजातील ज्या नागरिकांना संत रोहिदास विकास महामंडळाच्या सर्व विविध योजना गरिबांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा संस्थेचा संकल्प आहे.जास्तीत जास्त समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहून लाभ घ्यावाअशा प्रकारचे आव्हान भगवान हरिबा जावीर गुरुजी व बबन करडे साहेबसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळेव अर्जुन खांडेकर जगन्नाथ पारसे साहेब यांनी केले

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts