डॉ पंजाबराव देशमुख यांना बार्टी संस्थेत अभिवादन..डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक मा सुनिल वारे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिवादन करताना माननीय सुनील वारे म्हणाले की, महापुरुष हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे असतात महापुरुषांचा विचार हा मानवतेच्या कल्याणासाठी असतो देशाच्या कृषी क्षेत्रात डॉ पंजाबराव देशमुख यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख , यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 मध्ये कुणबी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे सांगून डॉ पंजाबराव देशमुख यांचे कृषी ,सहकार , शिक्षण सामाजिक क्षेत्रात योगदान असल्याचे नमूद करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, विभागप्रमुख रविन्द्र कदम, आरती भोसले, शुभांगी पाटील, लेखाधिकारी योगिता झानपुरे, कार्यालय अधिक्षक डॉ संध्या नारखडे, प्रज्ञा मोहिते, सचिन जगदाळे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले.आभार डॉ प्रेम हनवते, प्रकल्प व्यवस्थापक यांनी मानले.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...