(1) जीवन हिच एक स्पर्धा आपले सर्व जीवन एक स्पर्धा आहे त्याकडे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक भागात किंवा क्षेत्रात हल्ली प्रचंड स्पर्धा चालू आहे. त्या प्रत्येक क्षेत्राचा विचार वेगवेगळ्या न करता, आपण आपल्या जीवनाचा सर्वजण विचार केला पाहिजे : कारण जीवनाचे प्रत्यक्ष क्षेत्र परस्परांशी संबंधित असते. सध्या चालू असणारी ही स्पर्धा काही विशिष्ट काळासाठी, उदाहरणार्थ काही दिवस किंवा काही महिने किंवा काही वर्ष चालणारी अशी नसून ती एक वर्ष जीवनभर चालू असणारी अशी एक प्रक्रिया आहे. हे स्पर्धा काही विशिष्ट ठिकाणी अशी संबंधित आहे असेही नाही : जिथे जिथे आपण जाऊ या सर्व ठिकाणी आपणास स्पर्धा आढळते. आपल्याला आपल्या जीवनाचा विचार संपूर्णपणे, स्थळ, कला, व्यक्ती निरपेक्षपणाने करायला हवा. अशा प्रकारे विचार केला की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अगोदर स्पर्धा जिंकतात एवढेच नव्हे तर इतर बऱ्याच जणांच्या पासून खूप पुढे आहात. तुमच्या जीवनात आतापर्यंत आलेल्या लोकांच्या बद्दल विचार करा की ते कुठे आहे आणि तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे तुम्ही स्पर्धा जिंकत आहात. ही स्पर्धा सर्व आयुष्यभरासाठी ची आहे आणि केवळ काही दिवसासाठीची नव्हे. तुम्ही आतापर्यंत जीवनातील अनेक अडथळे यशस्वीपणे पार केले आहेत. आता तुमच्याजवळ जे काही आहे ते सर्व तुम्ही आपल्या प्रयत्नाने मिळवलेले आहे. यासाठी किती आणि कसे प्रयत्न करावे लागले आहेत याची केवळ तुम्हालाच कल्पना आहे. जीवनात अशा बऱ्याच वेळा आल्या आहेत की, जिथे केवळ तुम्ही होता म्हणूनच यश मिळू शकले किंवा सर्व गोष्टी व्यवस्थित घडू शकल्या. त्याचे श्रेय तुम्हाला मिळाले असेल किंवा नसेल ही: परंतु तुम्ही स्वतः जाणता की तुमचे योगदान किती महत्त्वाचे होते. तुमचे स्वतःचे महत्व समजणारे प्रथम व्यक्ती तुम्ही स्वतः असायला हवे. तुम्हाला स्वतःचे महत्व समजून घेणे शक्य व्हायला हवे किंबहुना तुमचे स्वतःचे महत्व समजणारे प्रथम व्यक्तीस तुम्ही स्वतःच असायला हवेत जर तुम्हाला स्वतःला तुम्ही महत्त्वाची व्यक्ती वाटत नसाल आणि इतर सर्वांना तुम्ही महत्त्वाचे वाटत असाल तर त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु जर तुम्हाला स्वतःला तुम्ही महत्त्वाची व्यक्ती वाटत असाल आणि इतर कोणालाही तुमचे महत्त्व वाटत नसेल तरी ते निश्चित की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी वाटचाल करत राहा तुम्ही आतापर्यंतच्या जीवनात यशस्वी ठरलेले आहात आणि निश्चितपणे या पुढच्या जीवनात सुद्धा यशस्वी ठरणार आहात. जग केवळ तुमच्यासाठी म्हणले नव्हते किंबहुना तुमच्या जीवनातून तुम्ही जगाचे निर्माण करत आहात. स्पर्धा हे जीवनाचे वास्तव आहे. सर्वच काळात सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्पर्धा ही नियमित होती: परंतु दिवसेंदिवस ती अधिक अवघड होत चालली आहे कारण-- वेगवेगळ्या साधनांची उपलब्ध. ती सर्व क्षेत्रात पसरत आहे. स्पर्धकांची संख्या वाढत आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला ही स्पर्धा जिंकणे गरजेचे आहे. स्पर्धेमध्ये उतरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरावेच लागेल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, जानतेपणी किंवा अजाणतेपणे, स्वेइच्छेने किंवा अनिच्छेने. परंतु स्पर्धेला पर्याय नाही हे निश्चित. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक क्रियेच्या मागे तेवढ्यात शक्तीची परंतु विरुद्ध दिशेने काम करणारी प्रतिक्रिया असते. कशात प्रकारे जीवनात आणि समाजात सुद्धा प्रत्येक वाईट बाजूला एक चांगली बाजू पण असते. जरी वर मांडलेल्या गोष्टीतून स्पर्धा कशी अधिक अवघड झाली आहे हे समाजात असले तरी या प्रत्येक अवघड वाटणाऱ्या गोष्टीमुळे स्पर्धा जिंकणे अधिक सोपे झाले आहे. उदाहरणार्थ- वेगवेगळ्या साधनाची उपलब्धता : स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारी साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे आणि होत आहे. काही वर्षांपूर्वी या गोष्टी एवढ्या मुबलकपणे उपलब्ध नव्हत्या एका अर्थाने विविध साधना सामग्रीची उपलब्ध ही चांगली गोष्ट आहे. कारण ही सर्व साधने तुम्हाला सुद्धा उपलब्ध आहेत एक काळ असा होता की, समाजातील केवळ काही लोकांनाच स्पर्धेचे आणि स्पर्धेसाठीचे ज्ञान आणि साधने उपलब्ध होती. त्याचे कारण शहर आणि ग्रामीण भागात असणारा फरक हे असले किंवा भाषामधील वैविध्य असल्यामुळे सर्व भाषांत ज्ञान किंवा माहिती उपलब्ध नसणे हे असले सध्या तशी परिस्थिती नाही. जी साधन सामग्री उदाहरणार्थ इंटरनेट जोशी, जेवढी, जेव्हा इतरांना उपलब्ध आहे : ती तशीच, तेव्हाचा, तुम्हालासुद्धा उपलब्ध आहे. पूर्वी काही ठराविक क्षेत्रातच स्पर्धा होती बरेचसे विद्यार्थी केवळ नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करत असत. स्पर्धेचा संबंध सरळ सरळ मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रीय तत्त्वाशी आहे. पूर्वी स्पर्धकांची संख्या कमी होती. त्यामुळे स्पर्धा कमी क्षेत्रात दिसत होती. आता स्वर्गाची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्पर्धक विविध क्षेत्रात उतरत आहेत आणि विविध क्षेत्रात स्पर्धा अधिक अवघड होत आहे. हल्ली वेगवेगळी क्षेत्रे स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी उपलब्ध आहेत. जर तुम्ही एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकला नसाल तर त्यामुळे काहीच बिघडत नाही, तुम्ही दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. जेव्हा स्पर्धेची क्षेत्रे कमी होती. तेव्हा असे बऱ्याचदा घडते आहे की, स्पर्धकांनी बरीच वर्षे स्पर्धेची तयारी केली आणि शेवटी त्याच्या हाती काहीच लागले नाही. जर स्पर्धक एका विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या एका विशिष्ट नोकरीसाठी अडकून बसलेला नसेल आणि आपल्या उद्दिष्ट बाबत जर तो थोडीशी लवचिकता दाखवत असेल तर त्याला आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. खाईन तर तुपाशी असा हट्ट धरणारा माणूस उपाशी राहण्याची शक्यता असते. एक काळ असा होता की, दुसऱ्याच्या भागात एकाएकीपणे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत असत. संपर्काची साधनेसुद्धा त्या काळात कमी होती. हल्ली विविध प्रकारची संपर्क साधने उपलब्ध आहेत स्पर्धेची तयारी करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची संपर्क साधून किंवा संपर्कात राहून तुम्ही तुमची टीम बनवू शकता अशा प्रकारे त्या स्पर्धेत तुम्ही कधीच एकाएकी पडणार नाही. स्वतःची चांगली टीम असल्यास यशस्वी होण्याची शक्यता बऱ्याच पटीने वाढते. आपल्याला दोन कान, दोन डोळे आवाजाच्या आणि दृश्याच्या त्रिमितीय अभ्यासासाठी दिले आहेत. अशाच प्रकारे जेव्हा दोन दुखी एकत्र येतात तेव्हा त्याची शक्ती तिप्पट झालेली असते.
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...