मंगळवार दिनांक 10/1/.2024 समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने काम करावे नामदेवराव श्रीरंग अयवळे संस्थेचे अध्यक्ष यांचे आव्हान या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सामाजिक काम करताना समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून ते काम केल्यास ते अधिक जोमाने वाढते प्रत्येकाने सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढे येण्याची गरज आहे समाजातून आपण मोठे होत असताना ते मोठेपण आपल्या एकट्याच्या बळावर प्राप्त होत नसून आपल्याला प्रगतीत समाजातील छोट्या मोठ्या अशा सर्वच घटकाचे योगदान आणि सहभाग असतो समाजातील अशा सक्षम व्यक्ती आणि संस्थांनी वंचित बेघर आणि मुख्य प्रवाह पासून दूर असलेल्या मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच निसर्गाच्या नियमानुसार तुम्ही जे काही चांगले वाईट कृत्य कराल त्या कृत्याची चांगली वाईट फळे या ना त्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतात असतात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मागे वळून पाहताना आपण हजारोंना मागे सोडून येथे आलो आहोत याची जाणीव ठेवून ते देखील आपल्यापर्यंत कसे पोहोचतील त्याचा जीवनस्तरदेखील कसा उचावेल हे आपण पाहिले पाहिजे तेच काम संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...