मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था, पुणे. संस्थापक अध्यक्ष श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे व सातारा जिल्ह्यातील समाज बांधव. सातारा येथे जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे "लिडकॉम आपल्या दारी" संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ हे पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने, मा. जिल्हाधिकारी सातारा श्री. जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली व मा‌. व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यशाळेचे आयोजन, दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सातारा येथे संपन्न झाले. चांभार ,होलार, ढोर ,मोची, मेळाव्यामध्ये मा. धम्मज्योती गजभिये साहेब यांनी अतिशय उत्तम मोलाचे मार्गदर्शन करुन सर्व समाज बांधवांची मनी जिंकली. सर्व योजनेची सविस्तर माहिती दिली, तसेच अर्ज वाटप व पात्र लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश मा श्री.धम्मज्योती गजभिये साहेब यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री.अमोल शिंदे साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन केले होते. तसेच यामध्ये होलार समाजाचे श्री.नामदेवराव आयवळे यांनी होलार समाजाला येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्याबाबत साहेबांच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या. त्यावेळी मा.श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभारी आहोत. धन्यवाद.......

 



Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts