महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळवण्यात येते की. 1 )महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष/सदस्य/सचिव समिती, सर्व 2) उपविभागीय अधिकारी(महसूल महाराष्ट्रातील सर्व जिल्हे. 3 ) तहसीलदार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विषयप:-होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत. संदर्भ: मा. महासंचालक, बार्टी पुणे यांचे पत्र क्र. बार्टी, सीव्हीसी/हो. समाज कार्या14(5)5715 दि.1.11.2023 दि.3.11.2023 संदर्भ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक 28. 8. 2023 व दिनांक 1.9.2023.(प्राप्त दिनांक 6. 10. 2023) उपरोक्त संदर्भीय विषयाअन्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील होलार समाजांच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करणेबाबत सूचना प्राप्त झालेला आहेत. त्या अनुषंगाने सदर प्रकरणावर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती. भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 आणि त्यानुसार तयार केलेला नेयम 2012 अन्वये व रक्तनातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नोव्हेंबर 2017 च्या अधिसूचनेअनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय, परिपत्रक यनुसार कार्यवाही करण्यात यावी याबाबत आपल्या स्तरावरून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवून उपरोक्त अधिनियम व नियमातील तरतुदी अनुसार होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही आपल्या मार्फत करण्यात यावी. तसेच काही अडचणी आल्यास लेखी तक्रार अर्ज करावा होलार समाज सामाजिक संस्थेकडे संपर्क साधावा मोबाईल नंबर 97 64 96 90 74 /79 72 14 0 451
Featured Post

About Me
Popular Posts
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...