महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजात प्रथमच इतिहास घडविणारी एकमेव संस्था होलार समाज सामाजिक संस्था पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य ही संस्था नियमित उपक्रम समाज उपयोगी राबवित आहे. अनुसूचित जातीची वंचित होलार समाज आर्थिक दुर्लभ व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजनेचे माहिती व मार्गदर्शन नियमित करते. मुख्य उद्देश हा महिलांना सक्षम करणे. जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. महिलां व मुली यांच्या बाबतीत होणारे भेदभाव थांबविणे व त्यांचा आत्म सन्मान वाढविणे. वंचित होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्रातून विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत हे इतिहासात प्रथमच घडत आहे. महाराष्ट्रातून कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकता प्रशिक्षण समाज कल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी बाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, जेईई नीट इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधीछत्रर्वती उपक्रमाबाबतही माहिती देण्यात येत आहे जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...