होलार समाज सामाजिक संस्था पुणे या संस्थेच्या शिष्टमंडळाने दि.28.11.2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे कार्यालयाला भेट दिली समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे. खुशखबर खुशखबर. अनुसूचित जातीतील घटक होलार समाजामध्ये जन्म घेतला परंतु त्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळत नाही कारण अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणींमुळे संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे आज पर्यंत होलार समाज बांधवांचे मोठे नुकसान झालेले आहे. कारण महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा आज अखेर लाभ घेता आलेला नाही. होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे. त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे, होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. यांनी सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे या कार्यालयाकडे केलेला पाठपुरावा व अथक प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आलेले यश या पुढे संघर्ष व अडचणीचा सामना करावा लागणार नाही काही अडचणी आल्यास होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा आपणास योग्य मार्गदर्शन व मदत केली जाईल. संपर्क मो.7972140451
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...