मा. श्री. अमोल आयवळे विभाग अध्यक्ष, सीवूडसू, शहर कार्याध्यक्ष-म.न.का.क.सेना व मा. श्री. दत्ता हेगडे प्राध्यापक मुंबई ज्येष्ठ नेते. व त्यांचे सहकारी यांनी दिनांक 12 1 2025 रोजी प्रत्यक्षात श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे जनसंपर्क कार्यालय सामाजिक संस्था पुणे या कार्यालयात भेट देण्यात आली त्यावेळी त्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष या नात्याने श्री नामदेव आयवळे यांनी अमोलजी आयवळे व त्यांच्या सर्व टीमचे फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी अमोल आयवळे बोलत होते संस्थेचे नाव ऐकून होतो परंतु प्रत्यक्षात भेटण्याची संधी आज मिळाली व प्रत्यक्षात पाहिल्यामुळे खरंच संस्था विविध क्षेत्रांमध्ये उल्लग्नीय काम करत आहे तसेच आपण होलार समाजाच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काम करत आहात ते समाजाला दिशादर्शक असेच आहे. तसेच होलार समाजाची रचनात्मक सेवा करण्याच्या उद्देशाने होलार समाज बांधवांची जनगणना करण्याचा माझा विचार मी करीत आहे या कामासाठी तुमच्या अनमोल मार्गदर्शनाची व सहकार्याची मला अपेक्षा आहे जेणेकरून माझ्या समाजातील अन्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना त्याचा उपयोग होईल. तसेच होलार समाजाचे ज्येष्ठ नेते श्री. दत्ता हेगडे यांनी बोलून दाखवले की होलार समाजामध्ये महाराष्ट्रातील सर्व संघटना संस्था यांनी नामदेवराव आयवळे यांच्याकडून संस्था संघटना कसे चालवले जाते ते शिकून घ्यावे काम करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे असे बोलून दाखवले तसेच त्यावेळी उपस्थित मान्यवर उद्योगपती श्री. मारुती गेजगे, आवर्जून उपस्थित होते त्यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच शोभा मॅडम. रुक्मिणी आयवळे अब्बासो ऐवळे. सुनील जावीर सर यांच्या उपस्थित कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आपला विश्वासू. तुमचे आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...