होलार समाज सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य), संस्थेच्या वतीने प्रामाणिक कार्यपद्धती व उद्देश ,(कालावधी 1.1.2025 ते 31.12. 2025 ) मोफत मोफत खालील प्रमाणे श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात. "होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे. अनुसूचित जातीतील होलार समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उच्छाविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी होलार समाज सामाजिक संस्थेमार्फत विविध योजनांची माहिती व मार्गदर्शक. 1 . महाराष्ट्रातून होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी, पुणे मार्फत विशेषता विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे विभागीय कार्यशाळा घेण्यास हो.स. सा. संस्थेला यश. 2 . दत्तक योजना मोफत केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समाजातील होनहार/ हुशार मुलांच्या सहभाग व्हावा यासाठी आपणही समाजाचे काही देणे लागतो" या तत्वावर"होलार समाज सामाजिक संस्था"फक्त होलार समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू, हुशार काही मुलांना ज्याची पदवी पूर्ण आहे अशा मुलांची चाळणी परीक्षा घेऊन पुण्यात काही महिन्यापर्यंत राहण्या खाण्याची मोफत सोय करण्याचे नियोजन आहे. 3 . मुला मुलींना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती माहिती व मार्गदर्शन. तज्ञांकडून केले जाते. 4 . गरजू विद्यार्थ्यांसाठी आठवी ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडीयमचे क्लास पुणे येथे मोफत. 5 . महिला बचत गट उद्योगासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक, सामूहिक व सामायिक लाभाच्या योजना याविषयी मार्गदर्शन. 6 . महाराष्ट्रातून होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर चर्चा व मार्गदर्शन. 7 . आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 8 आम्हीआय.एस.ओ.9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे प्रमाणपत्र 2025 ला मिळवणार 9 . होलार समाजातील भूमिहीन शेतमजूर अत्याचार पीडित यांना समाज कल्याण विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...