होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दि.19.2.2025 पासून प्रत्येक रविवारी दुपारी तीन ते चार या वेळेत संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे लाईफ कोच/जीवन-मार्गदर्शक विद्यार्थी, समाज बांधवांला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार ते ध्येय जीवनक्रम, नातेसंबंध, स्वतःची काळजी आणि इतर बऱ्याच बाबतीतले असू शकते . लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला त्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक मार्गांनी मदत करू शकतो उदा. : 1 .उद्दिष्ट ठरवणे : समाज बाधवाला त्यांची उद्दिष्टे ओळखण्यास आणि ते साध्य करण्यासाठी योजना बनविण्यात मदत करणे 2 . वर्तन बदल : समाज बांधवांला त्यांचे वर्तन आणि दृष्टीकोन बदलण्यास मदत करणे 3 .वैयक्तिक प्रगती : समाज बांधवांला त्यांचा आत्मसन्मान आणि स्वत:चे मूल्य सुधारण्यास व वर्धन करण्यात / वाढवण्यात मदत करणे 4 .नातेसंबंध : समाज बांधवांला त्यांचे इतरांशी संबंध सुधारण्यात मदत करणे 5 . जीवनक्रम : समाज बांधवांला त्यांचा जीवनक्रम आणि नोकरीची कामगिरी सुधारण्यास मदत करणे 6 .आरोग्य : समाज बांधवांला त्यांचे शारीरिक आरोग्य, भावनिक / मानसिक कल्याण आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करणे ............. लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला मदत करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात उदा. 1 . योग्य प्रश्न विचारणे 2 .समाज जे सांगतो त्याची कल्पना करणे / डोळ्यासमोर ते दृश्य पाहणे 3 .समाज बांधवांच्या मुद्यांची पुनर्मांडणी व.पुनर्बांधणी करणे 4 . समाजाच्या वर्तनाचे आकलन त्यानाच करायला लावणे. जीवन-मार्गदर्शन पद्धती : 1 . समोरच्या व्यक्तीला विविध गोष्टिं / जीवनपैलुंबाबत सध्या किती समाधानी आहे ते विचारणे 2 .त्या गोष्टी वा ते जीवनपैलू म्हणजे : आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, वागणूकसंबंधी, जीवनक्रमसंबंधी वगैरे 3 . त्यातून त्या माणसाचा पंचपदरी आकृतीबंध उलगडेल 4 .तो आकृतीबंध तसाच का आहे ते विचारणे 5 .त्या आकृतीबंधात संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा कशी करता येईल ते विचारणे 6 .सुधारणेसंबंधी विविध रण(व्यूह)नीती शोधणे 7 .त्यावर विचारमंथन करून एक रण(व्यूह)नीती सुनिश्चित करणे 8 . त्या रण(व्यूह)नीतीस लागू करण्यासाठी समोरच्याला असलेले बल / दौर्बल्य याचा आढावा घेणे 9 .बलवृद्धीसाठी नियोजन करणे 10 . दौर्बल्यर्हासास्तव नियोजन करणे वगैरे वगैरे सर्व योग्य मार्गदर्शक संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करणारं आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी .
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...