दिनांक. 24. 2. 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या शिष्टमंडळाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी लीडकॉमचे विभागीय अधिकारी यांनी अतिशय सुंदर माहिती दिली ते बोलत होते सांगली जिल्ह्यातून 50 ते 60 टक्के कर्ज प्रकरण होलार समाजाच्या फायली आहेत आम्ही हेड ऑफिसला मंजुरीसाठी पाठवून दिले आहेत. तसेच अध्यक्ष/सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष बोलत होते की. महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीची वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत तसेच बार्टी सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 माहिती पुस्तक देऊन श्री. नामदेवराव आयवळे व शिष्टमंडळ यांचे स्वागत करण्यात आले.व समाज कल्याण विभागाच्या विविध योजना,बार्टी अंतर्गत कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी आनील जावीर युवा नेते प्रभाकर केंगार पाटबंधारे अधिकारी. राजाराम गेजगे नेते चंद्रू केंगार युवा नेते . सुखदेव ऐवळे सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव गेजगे सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या बैठका अतिशय उत्सवात संपन्न झाल्या आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे .
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...