होलार समाज सामाजिक संस्था, (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने जाहीर आवाहन होलार समाजाचा सामाजिक आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर येथे नियोजित बैठक महाराष्ट्र शासन अध्यक्ष/सदस्य/सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांच्या आदेशाने नियोजित बैठक .डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला विचारे मळा कोल्हापूर या ठिकाणी दि. 20 मार्च 2025 रोजी वेळ दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या शिष्टमंडळ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व अथक प्रयत्नाने. कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर येथे संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ कोल्हापूर श्री. एन एम पवार साहेब विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला विचारे मळा कोल्हापूर येथे दुपारी 3 वाजत बैठक नियोजित आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्थेने मागील सहा वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ते वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधव, प्रतिनिधी, महिला, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, यांना आमंत्रित करण्यात येत आहे. सदर बैठकीचा सर्वांना लाभ होईल.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...