अभिनंदन व स्वागत होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे — ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणित संस्था (नोंदणीकृ संस्थेच्या वतीने नुकत्याच समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या मा. दीपा मुधोळ मुंडे यांचे मन:पूर्वक स्वागत व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव आयवळे आणि सचिव/सदस्य यांच्या शिष्टमंडळाने त्यांना फुलांचे बुके देत मुख्य कार्यालय, पुणे येथे सन्मानित केले. मा. दीपा मुंडे यांचे नेतृत्व प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेचा आग्रह, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यासाठी ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत राहून, केवळ एका वर्षाच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात: प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रस्त्यावर उतरून थेट काम केले, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई (सुमारे १५०० कर्मचाऱ्यांवर), अपहार करणाऱ्या वाहकांवर तात्काळ कारवाई, ब्रेकडाऊन बस संदर्भात नियमित तपासणी व कारवाई, पी.एम.पी.चे संचालनतूट कमी करण्यासाठी प्रवासी व फेऱ्यांचे सुयोग्य नियोजन, उत्पादनात वाढ करून ३ कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले गेले. या सर्व कार्यांची परिणती म्हणून पीएमपीएमएलच्या कारभारात लक्षणीय सुधारणा झाली होती. आता समाज कल्याण आयुक्त या नव्या पदावर त्यांची बदली झालेली असली तरी, त्यांच्या कार्यक्षमता, नेतृत्वगुण व सकारात्मक दृष्टिकोनामुळे समाज कल्याण विभागातही निश्चितच नवसंजीवनी मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...