होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 प्रमाणित – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष: मा. श्री. नामदेवराव आयवळे होलार समाज सामाजिक संस्था ही संस्था महाराष्ट्रातील वंचित घटकांपैकी होलार समाजातील समाजबांधवांसाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव आयवळे यांनी विविध शासकीय यंत्रणांशी सातत्यानं पत्रव्यवहार व पाठपुरावा करून जात पडताळणी प्रक्रियेसंदर्भातील अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या प्रयत्नांमुळे जात पडताळणी समित्या, सर्व महसूल विभाग तसेच बार्टी, पुणे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेले जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तातडीने निकाली काढले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक समाजबांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा सर्व गरजू बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेमार्फत विनामूल्य व प्रामाणिक मार्गदर्शन आणि मदत केली जाईल. संपर्कासाठी 7972140451
About Me
Popular Posts
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...