हक्काचं व्यासपीठ – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन संस्था) संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे समाजहितासाठी समर्पित एकमेव संस्था! होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, ही आमची प्रमुख जबाबदारी आणि प्रेरणा आहे. महाराष्ट्रातील समाजाच्या गरजा ओळखून आणि त्यावर योग्य उपाययोजना करत, आमची संस्था समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता – विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे! उच्च शिक्षण, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरी अशा अनेक संधींच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असते. मात्र, अनेक वेळा तांत्रिक त्रुटी, चुकीची नोंद, किंवा अपूर्ण माहितीमुळे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना या संधींपासून वंचित रहावं लागतं. जात पडताळणी समितीकडून वारंवार होणारी कागदपत्रांची मागणी दस्तऐवजांमध्ये चुकीच्या जातीची नोंद मानसिक आणि शैक्षणिक हानी या सर्व अडचणी लक्षात घेऊन, आमच्या संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केलं आहे. संस्थेची सेवा: विना मोबदला, सकारात्मक दृष्टीकोन जर आपल्याला जात प्रमाणपत्र मिळवताना किंवा जात पडताळणी प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येत असेल – तर होलार समाज सामाजिक संस्था आपल्या सोबत आहे! संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय करून संस्था आपली मदत करेल कोणतीही आर्थिक मागणी नाही – सेवा विना मोबदला होलार समाजासाठी, होलार समाजाबरोबर! होलार समाज सामाजिक संस्था कोणतीही गोष्ट अर्धवट करत नाही. समाजहितासाठी कार्य करत राहणं हेच आमचं ध्येय आहे. आपली साथ – समाजाचा विकास!
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...