*हेल्पेज इंडिया* व *डाॅईश बॅंक* तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत, बिबवेवाडी येथील *हाेलार समाज सामाजिक संस्थेच्या* सहकार्याने आज बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ राेजी गणपत नगर, पापळ वस्ती, बिबवेवाडी, पुणे या परिसरातील वय वर्षे ५० पुढील गरीब व गरजू ज्येष्ठ नागरीकांसाठी माेफत डाेळे तपासणी व चष्मा वाटप शिबीर मोठ्या थाटामाटात संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्याघाटन श्री भगवान जावीर गुरूजी समाजाचे प्रेरणा स्थान याच्या शुभहस्ती झाले बिबवेवाडी परिसरातिल धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व हाेलार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष *श्री नामदेव आयवाळे* यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हे शिबिर यशस्विरित्या पूर्णत्वास नेवून परिसरातील वृद्धांना या संधिचा लाभ मिळवून दिला. या शिबिरामध्ये १८० पेक्षा जास्त गरजू वृद्धांना डाेळे तपासून माेफत चष्मा वाटप करण्यात आले. परिसरातील वृद्ध स्त्रिया तर चष्मे व त्याची गुणवत्ता पाहूनच हरखून गेल्या हाेत्या व आपल्या आेळखीच्या इतर स्त्रियांना सांगून सांगून घेऊन येत हाेत्या. चष्मा घातल्यावर तर त्यांच्या चेहेर्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. सदर कार्यक्रमास हेल्पेज इंडिया चे पुणे विभागाचे व्यवस्थापक *श्री राजीव कुलकर्णी* यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या सहकारी श्रीमती रुपाली वाळूंज, व स्वयंसेवक साै. सराेज सावगावे आणी श्री. अनूप मल्हाेत्रा यांच्या सह आॅप्टिमेट्रिस्ट (डाेळे तपासणी तज्ञ) *श्री विरेंन्द्र राठाेड* व त्यांचे सहकारी श्री सचिन कामठे व श्री. बजरंग अवचारे यांच्या दिवसभर अविरतपणे व न कंटाळता हसतमुख चेहेर्याने केलेल्या सेवेची चर्चा परिसरात हाेती. तसेच ज्येष्ठ नेते शिरीष चव्हाण व किशोर साळुंखे अध्यक्ष व बडू जायबाई नेते व राजु आटाळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ पारसे साहेब यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार बडू जायबाई यांनी मानले
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...