होलार समाज सामाजिक संस्था, (महाराष्ट्र राज्य) स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी. पालक. दत्तक योजना एप्रिल 2022 पासून हा उपक्रम संस्थेने सुरू केले आहे. पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची मोफत सोय उपलब्ध केली आहे. संकल्पना संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे आज दिनांक 24/7/2022 रोजी स्पर्धा परिक्षा एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय होलार समाजाचे प्रेरणा स्थान भगवान जावीर गुरूजी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थींची विचारपुस केली व मी कसा शिक्षक झालो या. विषयावर मार्गदर्शन केले. ललिता विजय बोरा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची मने जिंकली, विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यावेळी नामदेवराव आयवळे बोलत होते. समाजातील गरीब होतकरू गरजू व कार्यक्षम विद्यार्थाना स्पर्धा परीक्षेत सक्षमपणे व आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे व त्यांचा शैक्षणिक बौध्दिक आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने संस्थेने अशे उपक्रम प्रत्येक रविवारी तज्ञांकडून मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे यांची विद्यार्थानी नोंद घ्यावी. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय रूपेश हातेकर साहेब यांच्या उपस्थितीत व स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी,संस्थेचे पदाधिकारी सारीका रूपेश हातेकर मॅडम व शोभा महेश जोशी मॅडम तसेच आनिल गुळदगड साहेब व नवनाथ जाधव साहेब सचीव अर्जुन खाडेकर साहेब आधिकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न झाला. प्रस्तावना नामदेवराव आयवळे पुणे यांनी. आभार मानले सौ. सारीका रूपेश हातेकर मॅडम यांनी
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...