होलार समाज सामाजीक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थेचे ध्ये उध्येश:-खालील प्रमाणे शाहू. फुले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सामाजीक समतेचे विचार जनसामान्यात रूजविण्यासाठी संस्थेची स्थापना दिनांक 8-3-2019 रोजी करण्यात आली समाजाची खरी सेवा संस्थेचा चळवळीचा उध्येश केवळ आपल्यातील व्यंग घालवण्यापुरता मर्यादित नाही. आपल्याला या समाजात एक आमूलाग्र बदल घडवून आणून क्रांती करायची आहे. आपल्याला जातीव्यवस्थेवर आधारित सर्व मानव निर्मित अडथाळे मोडायचे आहेत जेणे करून सर्वाना सर्वाच्चपदापर्यत प्रगती करायची व सर्व नागरी हक्क मिळवायची समान संधी मिळेल. आपल्या चळवळीतून आपल्याला जर एक जाती विरहित हिंदू समाज निर्माण करता आला तर ही एक प्रकारची देशाची सेवा तर होईल पण ही हिंदु समाजाचीही सेवा असेल. वैयक्तिक भेदभाव व अन्यायकारक बंधन असलेल्या या जातीव्यवस्थेमुळे देश व समाज कमजोर झाला आहे. आपली चळवळ समता. स्वातंत्र्य व बंधुभाव यांना आणखी बलवान करण्यासाठी खतपाणी घालेल . आपण ही चळवळ शांततेने करणार आहोत. पण आपण आक्रमक नाही. पण पिढ्यानूपिढ्या ज्यांनी आपल्याला दाबले त्यांनीच आपल्याला आक्रमक म्हणावे हे आशचर्यच आहे. तसेच आम्ही अंध युगातील लिहिलेल्या शास्त्र व स्मृतीनी नियंत्रित होण्यास तयार नाही.आमचा हक्क न्याय व मानवी आहे. आम्हाला सामाजीक क्रांती हवी आहे.प्रतेक घरात एक अधिकारी घडवण्याचा संकल्प पूर्णत्वास सोबत नेऊया आणि एक क्रांतिकारी सुरुवातीचे साक्षीदार व्हा स्पर्धा परिक्षा पुर्व तयारी विद्यार्थाना थोडी मंदत करा होलार समाज सामाजीक संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती व सदस्य आपला विश्वासू नामदेवराव आयवळे पुणे संपर्क मो नंबर 9764969074 दिनांक 29-8-2022 सोमवार
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...