https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे . महाराष्ट्रातील तमाम होलार बंधु आणि भगिनींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की. होलार ही अतिशय मागासलेली वंचित जात आहे. होलार समाजामध्ये पूर्वी ग्रामव्यवस्थेमध्ये वाजंत्रीचे काम केले जाई. त्यानंतर नवीन चप्पल बनविणे त्या दुरूस्त करणे. दोरखंड तयार करणे ही कामे हा समाज करीत असे आपली पोटाची खळगी भरण्यासाठी केले जात असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शहराकडे चला असा नारा दिला पण या समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समाजाची परवड आजपर्यंत सर्व बाबींत होत राहिली आहे. तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाच खर दुखण म्हणजे शिक्षणाचा अभाव शिक्षणाचे महत्त्व न कळणे व समाजाच्या मार्गात पूर्वीपासूनच चालत असलेल्या रूढी- परंपरांनी मोठे साखळदंड बांधले आहेत. त्यामुळे समाजाला प्रगतीचे रस्ते कधी दिसले नाहीत आणि जरी दिसले तरी समाजाची त्या दिशेने कधी वाटचाल झाली नाही.तसेच 2011मध्ये जनगणना झाली त्या वेळी महाराष्ट्रातील होलार समाजाची लोकसंख्या सुमारे 1 लाख 8 हजार 900 एवढी दाखवली आहे या समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. आम्ही ज्या समाजाजवळ राहिलो. ती - ती जात आम्हाला चिकटली आहे समाज एकसंघ नसल्यामुळे समाजाला नेताच मिळाला नाही त्यामुळे सत्तेतील प्रतिनिधीत्वही मिळाले नाही. त्यामुळे आजवर कोणताच विकास घडला नाही. यासाठी आपण सर्वांनी बुद्धीजीवी लोकांनी एकत्रित येऊन होलार समाजाला भेडसावणारे अडचणी सोडविल्या पाहीजे होलार समाजाच्या अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण,जातीचे अस्तित्व व चुकीच्या नोदीसंदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान, होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणा-या अडचणी विविध शासकीय योजनांची माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनाची माहिती तळागाळापर्यंत पोचली जात नाही आर्थिक दुर्बल लोकांसाठी ठोस असे उपाययोजना नाहीत वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाही असे निर्माण झालेल्या अडचणी या होलार समाजाच्या मुलभुत अडचणी सोडविणे गरजेचे आहे त्या दिशेने होलार समाज सामाजिक संस्था पुणे ही संस्था प्रमाणीक पणे प्रयत्न करत आहे.
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...