https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/महाराष्ट्रातील तमाम "होलार समाज बंधू आणि बहिणींना" अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की........ होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र ,महाराष्ट्र राज्य. होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री.भगवान हरीबा जावीर (गुरुजी) वसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष,श्री. नामदेवराव आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी , पुणे. व होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागातील होलार समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा दिनांक :-26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5ः30 या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,समाज कल्याण, नाशिक. या ठिकाणी एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्राथमिक अडचणी विषयावर मार्गदर्शन, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, बार्टीच्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक, अडी अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याबद्दल प्रथम बार्टीचे मनःपूर्वक आभारी आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होलार समाज विखरला गेला आहे. होलार समाजाला भेडसावणारे अडचणी,शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण व जातीचे अस्तित्व व जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान, होलार व होलेर यामधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणी, विविध शासकीय योजनेची माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचली जात नाही. शिक्षणाचा अभाव, उत्पन्न साधनांचा अभाव, रूढी परंपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस असे उपाययोजना नाहीत. वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही. अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये,अशा निर्माण झालेल्या अडचणी त्या होलार समाजाच्या मूलभूत प्रश्न आहेत हेच प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आहोत.
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...