मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना 2019 मध्ये झाली आज अखेर कार्यरत असलेल्या मागोवा घेतला मला अतिशय आनंद होत आहे या संस्थेमध्ये विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन.तसेच त्याची अंमलबजावणी व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न तसेच. 1 होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व सर्वागीण विकास व्हावा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला येणाऱ्या प्रत्येक प्रसन्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे.ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 1 स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजना पुणे येथे राहण्याची जेवणाची मोफत सोय 2) स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शक शिबिर. 3 ) 8 वी ते 12 वी मुलांसाठी मोफत क्लास, 4) शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. 5) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना अंतर्गत होलार समाजातील भूमीहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत प्रामाणिक पाठपुरावा करत आहे 6) होलार समाजाच्या समस्या जातीच्या चुकीच्या नोंदी जातीचे दाखले पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन. 7) मौजे कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे मालकीची वीस गुंठे जागा असून तेथे वस्तीग्रह उभारून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र अभ्यासिका लायब्ररी सुख सुविधा मिळाव्या यासाठी संस्थेचे नियोजन आहे. 8) महिला बचत गटासाठी विविध शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर 9) होलार समाजाच्या समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी बार्टी मार्फत सतत पाठपुरावा. 10) महाराष्ट्रातील वंचित होलर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर यांचे मनापासून आभारी आहे. 11) बार्टी मार्फत सांगोला, नाशिक, विभागातील होलार समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा संपन्न होत असताना अनेक अडचणी समोर मांडल्या गेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे व होलार समाजाचे प्रतिनिधींनी 12) होलार समाजाला बार्टीने विकासाच्या मूळ प्रवाहात आणावे. 13) होलार समाजातील MPSC/UPSC मुलां मुलींना रेल्वे, बँक, पोलीस विमा इत्यादी बाबत प्राधान्य मिळावे. 14) समाजातील अपंगांना अंधांना महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे भरवावीत. 15) होलार समाजातील मुला मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा. 16) होलार समाजातील जातीचे वैधता प्रमाणपत्राचे दाखले मिळत नाहीत.सन 1950 पूर्वीचे दाखले मागतात त्या सुट मिळावी. 17 होलार समाजाचे विद्यार्थी सध्या कोणत्या व्यवसायात कार्यरत आहेत ‌त्यांच्यामध्ये कोणते कौशल्य आहे व कोणत्या व्यवसायात ते प्रगती करू शकतात यानुषंगाने युवा गट तयार करून त्यांना प्रशिक्षित करावे. 18) होलार समाजाच्या महिला करिता नवीन योजना तयार करावी उदय. शिलाई मशीन ब्युटी पार्लर इत्यादी. 19) होलार समाजातील UPSC/MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अनुदान देण्यात यावे.

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts