मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

प्रति.मा. धम्म ज्योती जय साहेब व्यवस्थापकीय संचालक (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ. मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26. 10 . 2023 रोजी वंचित घटकातील होलार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस संत रोहिदास धर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित मान्यवरांना दिली व शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मांडाव्यात असे मान्यवरांना सूचित केले१. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे:-महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाला लीडकॉम संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळाने विकासाच्या मूळ प्रवाहात आणावे. आमची खात्री आहे लिड कॉमच आम्हाला न्याय देईल.२) बबनराव गणपती करडे.३) श्री जगन्नाथ सुखदेव पारसे.४) श्री मारुती चंदू कांबळे.५) श्री बापूराव पांडुरंग कांबळे.६) विजय शंकर केंगार७) श्री राजू सोपान ऐवळे.८) श्री पांडुरंग शंकर हातेकर.९) श्री सिताराम विठ्ठल आवळे.१०) श्री विजय सिद्राम ऐवळे.११) श्री विशाल जावीर. १२) श्री बाळासाहेब हेगडे.१३) महादेव पारसे.होलार समाजाच्या प्रमुख मागण्या.संत रोहिदास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व योजनांमध्ये सवलती वंचित होलार समाजाला मिळाव्यात.योजना -१ . ५० टक्के अनुदान योजना:- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकामार्फत ५०,०००/-पर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय दिले जाते या अर्थ सहाय्यापैकी रू१०,०००/- किमान मर्यादीपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते वरील कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यात अथवा बँकेत ठरवून दिलेल्या इत्यादी बँकेकडे परतफेड करावी लागते त्यामध्ये सवलत मिळावी.२) बीज भांडवल योजना:-रक्कम रुपये ५०,००० ते ५ लाख पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँका मार्फत अल्पसंख्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो या योजनेअंतर्गत स्वतः लाभार्थ्यांनी पाच टक्के रक्कम भरायची तसेच बँकेमार्फत 75 टक्के कर्ज पुरवठा केला जातो सदरच्या कर्जाची रक्कम रुपये १०००० ही महामंडळामार्फत अनुदान मिळते व उरीत रक्कम महामंडळामार्फत सदर कर्ज योजना दर चार टक्के आहे यामध्ये सवलती मिळाल्या.३) प्रशिक्षण योजना:-सदर योजनेअंतर्गत महामंडळामार्फत सुशिक्षित युवकांना प्रशिक्षण देण्यात येते त्याप्रमाणे संगणक प्रशिक्षण अंतर्गत मूळ संगणक प्रणाली या कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जावे.४) गटई स्टॉल योजना:- रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या होलार समाजातील लाभार्थ्यांना गटई स्टॉल पुरवण्याची १०० टक्के अनुदान तत्त्वावर, आयुक्त कल्याण पुणे व महामंडळामार्फत देण्यात यावे.५) थेट कर्ज योजना:- या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना बँकेऐवजी महामंडळामार्फत रक्कम रुपये ५०,००० रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्यासाठी व्याजदर व त्याची परतफेड 36 ते 60 हप्त्यामध्ये परतफेड करावी लागते त्यात काही सवलत मिळावी.६) प्लास्टर योजना;- सदर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात उभारला जाणारा व्यवसाय म्हणजे प्रिंटिंग प्रेस चप्पल कारखाना एलईडीवर डाळ मिल कापसाच्या वाती पिठाची गिरणी तसेच इतर उद्योग धंद्यांना प्रोत्साहन आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात यावा.७) केंद्र शासनाच्या योजना- यामध्ये सवलती मिळण्यात मुदतीत कर्ज योजना सक्षम पतपुरवठा योजना महिला समुद्री योजना महिला किसान योजना शैक्षणिक कर्ज योजना होलार समाजातील वाजंत्री कलाकारांसाठी इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज तसेच अनुदान द्यावे तसेच पेन्शन देऊन सक्षम करावे८) ज्येष्ठ नागरिक योजना स्वावलंबी योजनेअंतर्गत नागरिकांना सावलीतच्या दराने कर्ज द्यावे९) गेल्या 70 वर्षात होलार समाजाला राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही आपल्या माध्यमातून महामंडळामार्फत होलार समाजाचे दोन प्रतिनिधी महामंडळावर सदस्य म्हणून घ्यावेत श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे व श्री बबनराव करडे ही विनंती.१० होलार समाजातील महिलांसाठी महिला बचत गटांना सवलतीच्या दरात कर्ज तसेच अनुदान मिळावे.११) मौजे अमलापुर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे संस्थेकडे वीस गुंठे जागा आहे तिथे मला समाजातील वंचित मुला मुली साठी गरीब गरजू होतकरू स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पोलीस व मिलिटरी भरती रेल्वे बँक एलआयसी इत्यादी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह बांधण्याचे संस्थेचे नियोजन आहे परंतु यासाठी सामाजिक न्याय विभागाला आपल्या मंडळामार्फत सहायक आयुक्त प्रस्ताव पाठवावा विनंती१२) वंचित होलार समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या तसेच इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका अभ्यासिका तयार करण्यासाठी अनुदान योजना अंतर्गत होलार समाजाला जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळावा ‌.

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये वंचित ठरलेल्या होलार समाजातील सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असलेल्या "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" या संस्थेला ISO 9001:2015 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची मान्यता प्राप्त झाली आहे. ही संस्था होलार समाजातील पहिली संस्था ठरली आहे जिला ही प्रतिष्ठेची मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि समाजातील सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक उपलब्धी साध्य झाली आहे. ✦ संस्थेचा उद्देश व कार्य: या मानांकनामुळे संस्था समाजातील बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उद्योजकीय विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. ✦ शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम: शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष 100% शिक्षणाची हमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARC - BARTI), पुणे मार्फत स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कवाड उघडले गेले आहे उद्योजकीय विकास व व्यवसायिक मार्गदर्शन यावर भर: उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया प्रकल्प अहवाल, निधी उभारणी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद कारखाना भेटी, मार्केट सर्वेक्षण विविध प्रकारच्या उद्योगांबाबत माहिती: कृषी, खाद्य प्रक्रिया, केमिकल, प्लास्टिक इत्यादी ✦ कायदेशीर व शासकीय मदतीसाठी मार्गदर्शन: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रिया समाज कल्याण विभागाच्या योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी नोंदणी, उद्योग परवाने व नोंदणी प्रक्रिया महामंडळांच्या कर्ज योजना महसूल व इतर सरकारी कार्यालयांशी सहकार्य ✦ विभागीय कार्यशाळांचे आयोजन: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यशाळांचे आयोजन करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांना विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवली जात आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी अभिमानास्पद आहे. हे फक्त मानांकन नसून, समाजाच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts