आपले सर्व जीवन हीच एक स्पर्धा आहे त्याकडे आपण सर्वांगाने पाहिले पाहिजे .जीवनाच्या प्रत्येक भागात किंवा क्षेत्रात हल्ली प्रचंड स्पर्धा चालू आहे. त्या प्रत्येक क्षेत्राचा विचार वेगवेगळ्या न करता, आपण आपल्या जीवनाचा सर्वागिन विचार केला पाहिजे : कारण जीवनाचे प्रत्येक क्षेत्र परस्परांशी संबंधित असते. सध्या चालू असणारी ही स्पर्धा काही विशिष्ट काळासाठी, उदाहरणार्थ काही दिवस किंवा काही महिने किंवा काही वर्ष चालणारी अशी नसून ती एक सर्व जीवनभर चालू असणारी अशी एक प्रक्रिया आहे ही स्पर्धा काही विशिष्ट ठिकाणाशी संबंधित आहे असेही नाही: जिथे जिथे आपण जाऊ त्या सर्व ठिकाणी आपणास स्पर्धा आढळते आपल्याला आपल्या जीवनाचा विचार संपूर्णपणे ,स्थळ, काल, व्यक्ती निरपेक्षेपणाने करायला हवा. अशा प्रकारे विचार केला की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अगोदर स्पर्धा जिंकत आहात एवढेच नव्हे तर इतर बऱ्याच जणांच्या पासून खूप पुढे आहात तुमच्या जीवनात आतापर्यंत आलेल्या लोकांच्याबद्दल विचार करा की ते कुठे आहेत आणि तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे प्रकारे तुम्ही स्पर्धा जिंकत आहात . ही स्पर्धा आयुष्यभरासाठीची आहे आणि केवळ आणि केवळ काही दिवसांसाठीची नव्हे , तुम्ही आत्तापर्यंत जीवनातील अनेक अडथळे यशस्वीपणे पार केले आहेत . आता तुमच्याजवळ जे काही आहे ते सर्व तुम्ही आपल्या प्रयत्नाने मिळवले आहे .यासाठी किती आणि कसे प्रयत्न करावे लागले आहेत याची केवळ तुम्हालाच कल्पना आहे . जीवनात अशा बऱ्याच वेळा आल्या आहेत. आपण स्पर्धा जिंकत आहोत.की, जिथे केवळ तुम्ही होता म्हणूनच यश मिळू शकले किंवा सर्व गोष्टी व्यवस्थित घडू शकल्या, त्याचे श्रेय तुम्हाला मिळाले असेल किंवा नसेलही परंतु तुम्ही स्वतः जाणता की तुमचे योगदान किती महत्त्वाचे होते.तुमचे स्वतःचे महत्व समजणारे प्रथम व्यक्ती तुम्ही स्वतः असायला हवे. तुम्हाला स्वतःचे महत्व समजून घेणे शक्य व्हायला हवे. किंबहुना तुमचे स्वतःचे महत्व समजणारे प्रथम व्यक्ती तुम्ही स्वतःच असायला हवे. जर तुम्हाला स्वतःलाच तुम्ही महत्त्वाचे व्यक्ती वाटत नसाल आणि इतर सर्वांना तुम्ही महत्त्वाचे वाटत असाल तर त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु जर तुम्हाला स्वतःला तुम्ही महत्त्वाचे व्यक्ती वाटत आसाल आणि इतर कोणालाही तुमचे महत्त्व वाटत नसेल तरीही हे निश्चित की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी वाटचाल करत राहाल. तुम्ही आतापर्यंतच्या जीवनात यशस्वी ठरलेला आहात आणि निश्चितपणे यापुढच्या जीवनात सुद्धा यशस्वी ठरणार आहत.जग केवळ तुमच्यासाठी बनले नव्हते . किंबहुना, तुमच्या जीवनातून तुम्ही जगाचे निर्माण करत आहात. होलार समाज सामाजिक संस्था पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य)तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...