होलार समाज सामाजिक संस्था पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या पुढाकाराने.होलार समाजाचा सामाजिक ,आर्थिक व सर्वांगीण विकास व्हावा,शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, तसेच जातीचे दाखले पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी भेडसावत आहेत त्या सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत.तसेच महाराष्ट्रातील होलर समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच होलार समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत मागासलेला समाज असून या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही.हे श्री नामदेवराव आयवळे यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे व सतत पाठपुरावा करत आहे तसेच अनेक संदर्भ देऊन जात प्रमाणपत्र व त्याच्या पडताळणी आणि याचे असणारे अनन्यास साधारण महत्त्व याविषयी भाषा करताना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील लोकांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि पाठपुरावा करणे त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच अर्ज करणे. महाराष्ट्रातील होलार समाज जात प्रमाणपत्र तपासून जे अद्याप वंचित आहेत, त्यांच्याकरिता विशेष अभियान तहसील व प्रात कार्यालयामार्फत आवर्जून राबविण्यात महासंचालक यांनी आदेश दिले आहेत समितीमार्फत ही विशेष शिबिरे याचे आयोजन करण्यात येणार आहे याकरिता महसूल विभाग बार्टी आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून तालुका व गाव पातळीवर देखील याबाबत विविध माध्यमातून जनजागृती तसेच प्रत्यक्ष शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावीअसे आव्हान श्री भगवान जावीर गुरुजी पेरणास्थानश्री दत्तात्रय कृष्णा करडे साहेब प्रवक्ताश्री बबन करडे साहेब सल्लागारश्री अर्जुन खांडेकर सचिवश्री जगन्नाथ पारसे साहेब खजिनदार
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...