खुशखबर खुशखबर खुशखबर होलार समाजाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. मा. धम्मज्योती गजभिये साहेब. व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई येथे दि.28/6/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी होलार समाजाच्या विविध मागण्याना संदर्भात काही मागण्या मान्य केले आहेत तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाचे कर्जाच्या प्रकरणाबाबत. तात्काळ मंजुरी देण्यात आल्या आहेत. व प्रलंबित प्रकरणे ही मंजूर केली जाणार आहेत त्याबद्दल मा. धम्मज्योती गजभिये साहेब यांचे मनापासून अभिनंदन. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यां शिष्टमंडळाने यांच्याशी झालेल्या दिनांक 28. 6 .2024 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. लीडकॉम विभागीय कार्यालय, यांनी होलार समाज सामाजिक संस्था पुणे यांच्या शिष्ट मंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मा. व्यवस्थापिका संचालक यांना विविध मागण्याचे पत्र सादर केले. तसेच श्री नामदेव आयवळे यांनी होलार समाजाचे अनेक प्रश्नांना महामंडळाने मदत करावी अशी मागणी केली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था, पुणे तसेच शिष्टमंडळ सदस्य उपस्थित होते या बैठकीतील झालेल्या चर्चेचे वितवृत्त पुढील प्रमाणे त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी इतिवृत्तातील नमूद आपल्या विभागाशी संबंधित निर्देशाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून हे पत्र मिळाल्यापासून तात्काळ व्यवस्थापकीय संचालक यांना अनुपालन अहवाल सादर करावा मा. व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने आदेश देण्यात आले आहे.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...