मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे मार्फत विशेषता: विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याबद्दल माननीय सुनीलजी वारे सर महासंचालक यांचे हार्दिक अभिनंदन. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने. श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात तथा अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. लातूर येथे एक दिवशीय विभागीय कार्यशाळा दिनांक. 21.1.2025 रोजी नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. त्यावेळी लातूर सारख्या अतिदुर्गम भागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली . तसेच दिनांक 10 .3. 2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पुणे विभागीय कार्यशाळा सांगोला येथे आयोजित करण्यात आली होती पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून सांगोला येथे कार्यशाळा यशस्वी केली. तसेच. दिनांक 17. 7.2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील होलार समाजातील युवक- युवतींसाठी आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने ऑनलाईन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळा यशस्वी केली. दिनांक 26. 9. 2023 रोजी श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नाशिक विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली. त्यामुळे होलार समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. समाज बांधव त्याचा लाभ घेत आहे. तसेच महाराष्ट्रातील होलार समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्रित करण्यात होलार समाज सामाजिक संस्थेला यश येत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करून राज्य मेळावा आयोजित करावा अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. सर्वांशी चर्चा करून ठिकाण तारीख कळवली जाईल. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क.7972140451

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts