होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याबद्दल बार्टीचे महासंचालक व टीमचे होलार समाजा बाधवाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. होलार समाजाला जात दाखला व जात पडताळणी सारखा अतिशय अवघड विषय सोपा करण्यात येश येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्या मान्यतेने श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा महाराष्ट्रातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, व सर्वांगीण विकास व्हावा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी व बार्टी मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण, यु.पी.एस.सी.,एम.पी.एस.सी.पोलीस व मिलिटरी, बँक, रेल्वे, एल.आय.सी. व समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, या सर्व योजनेपासून होलार समाज वंचित आहे. कारण होलार समाजाच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीची वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता आलेला नाही. .हे शासनाच्या निदर्शनात आणून देण्यात आले आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे व शिष्टमंडळ यांनी सतत वरील मागण्या केल्यामुळे. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांनी सूचनावर गंभीरपूर्वक विचार करून संबंधित विभागांना. होलार समाजातील मागण्यांना न्याय मिळवून देण्यास बार्टी कटिबद्ध असल्याचे सांगून होलार समाजाच्या त्यांनी बार्टी अंतर्गत कार्यात असलेल्या विभागामार्फत सदरील कामकाजाची जबाबदारी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर सुपूर्द केली आहे. तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.तसेच दिनांक. 21.1.2025 रोजी लातूर सारख्या अतिदुर्गम भागातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली. तसेच दिनांक. 10.3.2023 रोजी पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून सांगोला येथे कार्यशाळा यशस्वी केली. तसेच दिनांक. 17 .7 .2023 रोजी महाराष्ट्रातील होलार समाजातील युवक - युवतींसाठी आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त ऑनलाइन पद्धतीने स्वातंत्र्य एक दिवशीय विभागीय कार्यशाळा यशस्वी केली. दिनांक. 26. 9. 2023 रोजी. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली. तसेच समाज बांधवांना प्रत्येक वेळी एकत्रित आले त्यामुळे आलेले यश. होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. तसेच विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोचण्यास मदत होत आहे. बार्टीचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...