होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित | आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था) सामाजिक आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागातील वंचित होलार समाजातील अडचणींच्या अनुषंगाने विभागीय कार्यशाळा आयोजित विषय: एक दिवसीय विभागीय कार्यशाळा — दिनांक 10 जुलै 2025, वेळ: सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक: होलार समाज सामाजिक संस्था, पुणे सहकार्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे कार्यशाळेचे उद्दिष्ट: या कार्यशाळेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील होलार समाजातील बांधवांसाठी खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे: महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया समाजकल्याण विभागाच्या विविध योजना BARTI मार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व मार्गदर्शन या सर्व विषयांवर संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आपणास नम्र आवाहन: सर्व समाजबांधव, संघटनेचे प्रतिनिधी, युवा व ज्येष्ठ सदस्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. आयोजकांचा संपर्क क्रमांक व श्री.बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार 860 53 42 324 श्री. अँड जी एन ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे कायदे सल्लागार.9922521120 श्री. अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव 9823019240 श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार 8830564844 आपल्यामुळे समाज सशक्त बनेल! आपली उपस्थिती समाजाच्या विकासासाठी मोलाची ठरेल
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...