नवीन वर्ष नवीन संकल्पना
विषय:- अधिकारी बनवण्यासाठी संस्थेचा उपक्रम
अधिकारी हा समा जाचा दागिना असतो.
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समाजातील होनहार/हुशार मुलांचा सहभाग व्हावा यासाठी "Back To Society", "आपणही समाजाचे देणे लागतो" या तत्वावर "होलार समाज सामाजिक संस्था" फक्त होलार समाजातील आर्थिकदृष्टया गरीब, गरजू, हुशार काही मुलांना ज्यांची पदवी पूर्ण आहे, अशा मुलांची चाळणी परीक्षा घेऊन पुण्यात काही महिन्यांपर्यंत राहण्या-खाण्याची मोफत सोय करण्याचे नियोजन आहे.
सदरील उपक्रमासाठीचे नियम व अटी
1) विद्यार्थी होलार समाजातील असावा
2) कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण
3) आर्थिकदृष्ट्या गरजू, गरीब असावा
4) विद्यार्थ्याची पुण्यात फक्त राहण्या-खाण्याची सोय होईल
5) निवड फक्त 10 महिन्यांकरिता असेल
6) ही सोय देणगी वर आधारित असेल याचे मुलांना गांभीर्य असावे
7) देणगीदारांना प्रत्येक खर्चाचा हिशोब दिला जाईल
8) चाळणी परीक्षेद्वारे निवड केली जाईल
9) अंतिम निर्णय संस्थेचा असेल
संस्थापक:- श्री. नामदेव आयवळे
मार्गदर्शक:- श्री. सचिन गुळीग
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा