मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे. संस्थेचे ध्येय उद्देश. महाराष्ट्रातील वंचित माता भगनीच्या व युवा युवतींच्या आयुष्यात अमोल ग्रस्त बदल घडावे यासाठी मागील पाच वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे.ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच संस्थापक अध्यक्ष श्री नामदेव राव आयवळे. प्रेरणास्थान श्री भगवान जावीर गुरुजी आणि श्री .बबन करडे नायब तहसीलदार. श्री.अर्जुन खांडेकर अँड , श्री.जी. एन. ऐवळे व जगन्नाथ पारसे श्री. दत्तात्रय करडे प्रवक्ते. यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार व बार्टी पुणे. लीडकॉम महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, अडी - अडचणी सोडवण्यासाठी विशेष स्वातंत्रपणे विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याबद्दल प्रथम बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे सर व सर्व टीमचे मनःपूर्वक आभारी आहे. तसेच मा. श्री. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक लीडकॉमचे सर्व टीमचे मनःपूर्वक आभारी आहे. होलार समाजातील युवकांना उद्योजकात प्रशिक्षण लइडकॉम मार्फत शिवणकला, बुटी पार्लर, इलेक्ट्रिक वायरमेन टर्नर /फिटर,मशीनवर स्वेटर ,विणणे, खेळणी बनवणे, टी व्ही, रेडिओ, टेप रेकॉर्ड, मेकॅनिक, संगणक प्रशिक्षण, मोटर वायडिंग, फॅब्रिकेटर, वेल्डिंग, ऑटोमोबाईल रिपेरिंग, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, वाहनचालक, चर्मउद्योग पदत्राण उत्पादन, चर्मो उद्योग चर्मवस्तू उत्पादन, यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. मोफत प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस दरमहा रु.150 ते 300 पर्यंत विद्या वेतन देण्यात येते.आहे. तसेच समाज कल्याण मार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात प्रमाण पडताळणी बाबत मार्गदर्शन बार्टी मार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण यूपीएससी एमपीएससी, आयबीपीएस इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपक्रमाबाबत माहिती देण्यात येत आहे जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. तसेच महाराष्ट्रातील समाज बांधवांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करावेत लाभ नक्कीच मिळेल काही अडचणी आल्या तर संस्थेची संपर्क साधावा होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य तुमच्या आमच्या हक्काच्या माणूस नामदेवराव आयवळे पुणे.7972140451

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts