मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या वतीने अध्यक्ष/ सचिव/सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर मुख्य कार्यालय येथे शिष्टमंडळाने दि.11 जून 2024 रोजी भेट देऊन खालील अडचणीवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाचा सर्विंग विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीला भेट देणार. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ ‌ बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे.यानी महाराष्ट्रातील सर्व अध्यक्ष/ /सचिव /सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.याची ही आठवण करून देण्यात आली तसेच होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. उपरोक्त संदर्भीय विषयाअन्वये समाज बांधवांना कळविण्यात येते की. महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुढील अडचणी बापाचे आडनाव मांग, सुतार, लोहार, धनगर, अशा अडचणी निर्माण झालेले आहेत शासनाच्या निदर्शनात दि. 8 जुलै 2015 पासून ते आज अखेर या अडचणी सर्व संघटना व संस्थांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे परंतु प्रश्न मार्गी लागलेला नाही. होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावेद . त्या अनुषंगाने सदर प्रकरणावर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती. भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या अडचणीचे विनियम) आधिनियम 2000 आणि त्यानुसार तयार केलेला नियम 2012 अन्वये व रक्तनातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नोव्हेंबर 2017 च्या अधिसूचनेनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय, परिपत्रक यनुसार कार्यवाही करण्यात यावी याची ही आठवण करून देण्यात आली. तसेच अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी व जात वैधता प्रमाणपत्रासाठी 8 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा मागितला जातो 27 नोव्हेंबर 2017 च्या शासन अधिसूचनेत अर्जदाराने जात पडताळणी समितीकडे अर्जाच्या रक्त नात्यासंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडीलाकडील रक्त नात्यासंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांची जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्रधिका-याने इतर कागदपत्राची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेल्या वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे तरी पण संबंधित अधिकाऱ्याकडून पुन्हा त्याच त्याच पुराव्याची मागणी करून अर्जदाराची अडवणूक केली जाते याची आठवण करून दिली आहे. जात पडताळणीचे अध्यक्ष सोलापूर बोलत होते होलार समाजातील ज्यांना ज्यांना जात पडताळणीची अडचणी येतात त्यांनी प्रथम अर्ज करावेत काही अडचणी आल्यास त्या विशेष मोहीम राबवून सोडवल्या जातील असे बोलत होते.




 

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्फत कोल्हापुरी चप्पल उत्पादन करणाऱ्या करारासाठी G I नामांकन करणेसाठी व सभासद नोंदणीचे काम चालू आहे,तरी कोल्हापूर,सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील सर्व चप्पल बनवणाऱ्या कारागिरांनी वरील फॉर्म ऑनलाइन भरावे व यामध्ये फॉर्म भरताना कांहीं अडचण आल्यास विश्वास करंबे जिल्हा कार्यालय कोल्हापूर mo no 9096382278 व सतीश कांबळे मोबाईल फोन 9823431916यांचेशी संपर्क करावा. आपला विश्वास तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क7972140451 https://forms.gle/2E7rp1RrhCo4BzWt7

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts