होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने विद्यार्थी व सेवानिवृत्ताचा सत्कार संपन्न दि.12/6/2024 रोजी आजनाळे ता.सागोला जिल्हा सोलापूर येथे श्री. रावसाहेब भजनावळे सर यांनी शिवणे माध्यमिक या शाळेत ज्ञानदानाचे काम जवळजवळ 34 वर्ष करून वयानुसार सेवानिवृत्त झाले यांचा सत्कार होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे व शिष्ट मंडळ यांनी पुण्यावरून येऊन करण्यात आला तसेच. अजनाळे गावच्या सुकन्या काजल बबन भंडगे हिने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेमध्ये घवघवीत येश संपादन करून केंद्रात प्रथम क्रमांकाने उतरणे झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला तसेच बचत गटाच्या महिला अध्यक्ष चैतन्य भंडगे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला तसेच महूदचे श्री. महादेव पारसे साहेब ग्रामपंचायत मध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच आदरणीय अजनाळे गावचे होलार समाज बांधवांनी ही पुढाकार घेऊन ग्रामपंचायत सदस्य वस्ताद महादेव भंडगे व व बचत गटाच्या चैतन्य भंडगे तसेच होलार समाज बांधवांनी ही पुढाकार घेऊन व कार्यकर्त्यांनी श्री. नामदेव आयवळे अध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला त्यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाब्बास...... प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो प्रथम आपण प्राप्त केलेल्या यश बद्दल तुमचे, पालकांचे आणि शिक्षक वर्गाचे मनापासून अभिनंदन.... विद्यार्थी मित्रांचा आवडता शब्द म्हणजे शाब्बास...... हीच तीन अक्षरे काम करून जातात... तुम्ही विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देऊन जातात.., तुम्ही घेतलेल्या कष्टांमुळे तुम्ही या शब्दासाठी खऱ्या अर्थाने पात्र झाला आहात . मित्रांनो तुम्ही विद्यार्थी, पालक वर्षभर चिकाटीने कष्ट, मेहनत करीत असतात. त्यांचे चीज होऊन तुम्ही यशस्वी झालात त्याचे तुम्हाला समाधान हे असतेच. या समाधानामध्ये आजूबाजूचा समाज जर सहभागी झाला तर तो"आनंदोत्सव " सर्वांचा अगदी कायम लक्षात असाच राहतो. पुढचे यशस्वी वाटचाल करताना तुम्हाला ही कौतुकाची शिदोरी कायम उपयोगी पडत असते. म्हणूनच हा कौतुक सोहळा. आपणास भविष्यातील यशाची नवनवीन शिखरे पदकक्रांती करण्यासाठी, नवीन ऊर्जा मिळण्यासाठी खरंच हीच तीन अक्षरी बळ देतात.,. ती म्हणजे" शाब्बास"... पुन्हा एकदा आपले अभिनंदन आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा.. शुभेच्छुक होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सर्व संचालक मंडळ सदस्य आणि समाज बांधव
About Me
Popular Posts
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...